हृतिक रोशनला पछाडून झेन मलिक ठरला ’एशियन सेक्सिएस्ट 2016’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 17:19 IST2016-12-14T17:19:07+5:302016-12-14T17:19:07+5:30
आशियातील सर्वांत सेक्सी महिला म्हणून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची निवड करण्यात आली होती. आशियातील सर्वांत सेक्सी पुरु षही बॉलिवूड ...

हृतिक रोशनला पछाडून झेन मलिक ठरला ’एशियन सेक्सिएस्ट 2016’
मागील वर्षी ‘एशियन सेक्सिएस्ट मेन’म्हणून हृतिक रोशनची निवड करण्यात आली होती. यावर्षी केलेल्या सर्वेक्षणात हृतिक रोशन दुसºया स्थानी आहे. तिसºया स्थानासाठी जोरदार टक्क र पाहायाला मिळाली असून, यात अभिनेता फवाद खान, टीव्ही स्टार आशिष शर्मा व सलमान खान यांची वर्णी लागली आहे. तिघांना सारखी मते मिळाली. पहिल्या पाच स्थानात दोन पाकिस्तानी तर तीन भारतीय कलावंतांमध्ये स्पर्धा झाली. सहाव्या स्थानी टीव्ही स्टार बरुण सोबती, सातव्या स्थानी अभिनेता शाहीद कपूर, आठव्या स्थानी विवियन डिसेना, तर नवव्या व दहाव्या स्थानी अनुक्रमे अली जफर व रणवीर सिंग यांची निवड करण्यात आली आहे.
इस्टर्न आयने प्रसिद्ध केलेल्या यादीत शाहरुख खान १७ व्या स्थानी आहे. तर या यादीत प्रथमच स्थान मिळविणारा २४ वर्षीय टीव्ही स्टार परम सिंग १९ व्या स्थानी आहे. या यादीत पाकिस्तानातील चहाचे दुकान चालविणारा अर्शद खान याचाही समावेश करण्यात आला आहे. अशर्दने या यादीत ३१ वे स्थान मिळविले आहे. काही महिन्यापूर्वी अर्शद खानचा फोटो जगभरात चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. पाकिस्तानी सिने इंडस्ट्रीमधून अशर्दला मॉडेलिंगच्या आॅफर मिळाल्या होत्या.
आशियातील सेक्सिएस्ट महिलांच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्रींचा दबदबा दिसला होता तर पुरुषांच्या यादीत पाकिस्तानी कलावंतानी बॉलिवूड कलावंताना चांगलेच आव्हान दिले आहे.