वाढदिवशी आराध्याने परिधान केलेल्या फ्रॉकची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 17:27 IST2017-11-21T11:38:08+5:302017-11-21T17:27:21+5:30

सेलिब्रेटींचे लाइफस्टाइल खरच वेगळे असते. त्यांच्या खान-पानापासून कपडे परिधान करण्यापर्यंत सर्व्याच गोष्टी अनोख्या असतात. मात्र आता सेलिब्रेटींपेक्षाही स्टारकिडसचाच थाट ...

You will be surprised to hear the value of Frock, who is dressed appropriately on birthday. | वाढदिवशी आराध्याने परिधान केलेल्या फ्रॉकची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

वाढदिवशी आराध्याने परिधान केलेल्या फ्रॉकची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

लिब्रेटींचे लाइफस्टाइल खरच वेगळे असते. त्यांच्या खान-पानापासून कपडे परिधान करण्यापर्यंत सर्व्याच गोष्टी अनोख्या असतात. मात्र आता सेलिब्रेटींपेक्षाही स्टारकिडसचाच थाट मोठा असल्याचे गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत फक्त ऐश्वर्याच्या सौदर्य तिचे ड्रेसिंग स्टाइलवर लोक जास्त चर्चा करायचे आता ऐश्वर्यानंतर तिली लेक आराध्यावरही चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच 16 नोव्हेंबर रोजी आराध्या सहा वर्षांची झाली. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐश्वर्या-अभिषेकने त्यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत आराध्याने पिंक फ्रॉक घातला होता.खास आराध्यासाठी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने हा फ्रॉक डिझाइन केला होता. या फ्रॉकमध्ये आराध्या अगदी राजकुमारीसारखीच भासत होती.सध्या आराध्याचेहे क्युट फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतायेत.तिच्या या फोटोंना खुप सारे लाईक्स आणि कमेंटस मिळतायेत.मात्र आणखीन एका गोष्टीची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. ती म्हणजे आराध्याने परिधान केलेला फ्रॉक सिंपल अँड सोबर वाटत असला तरी या फ्रॉकची किंमत ऐकून तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही. या डोळे दिपवणा-या आराध्याच्या फ्रॉकची किंमत तब्बल 60 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शाहरुखची लेक सुहाना खानही याच गोष्टीमुळे जास्त चर्चेत आहे. सोशल मीडियावर कधी सुहानाचे फोटो व्हायरल होतात तेव्हा अनेक नेटीझन्स तिला लाईक्स कमेंटस देताना दिसतात.मात्र शाहरूखच्या वाढदिवसाच्या दिवशी सुहाना मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली. सुहानाने यावेळी पांढरा रंगाच टीशर्ट घातला होता.गोल्डन रंगाचे शूजही घातले होते.यावेळी सुहानाने घातलेल्या पांढ-या रंगाच्या टी-शर्टचीच किंमत जवळपास 64,000रू.इतकी असल्याचे बोलले गेले. त्यामुळे बॉलिवूड पदार्पणापूर्वीच सुहाना तिच्या महागड्या ड्रेसिंग स्टाइलमुळे जास्त प्रकाशझोतात आली आहे.

आराध्या बच्चन झाली सहा वर्षांची ! आजोबांनी शेअर केला क्यूट फोटो!!

महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि ऐश्वर्या राय बच्चन व अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन हिचा (१६ नोव्हेंबर)वाढदिवस. आराध्या सहा वर्षांची झाली.आराध्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजोबांनी सोशल मीडियावर आपल्या लाडक्या नातीचा एक सुंदर फोटो शेअर केला.अमिताभ यांनी त्यांच्या सोशल अकाऊंटवरून हा फोटो शेअर करत त्याला समर्पक अशी कॅप्शनही दिली होती.‘आराध्या किती मोठी झालीय, हेच या फोटोवरून कळले,’ अशा कॅप्शनसह अमिताभ यांनी आराध्याचा एक अतिशय सुंदर फोटो पोस्ट केला होता.

Web Title: You will be surprised to hear the value of Frock, who is dressed appropriately on birthday.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.