दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या ‘या’ विंटेज कोटची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 21:04 IST2018-05-29T15:26:45+5:302018-05-29T21:04:18+5:30

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण नुकतीच मुंबई विमानतळावर बघावयास मिळाली. यावेळी तिने लॉन्ग हायवेस्ट जीन्स आणि व्हाइट टी-शर्टवर विंटेज कोट ...

You will be shocked to know the price of this 'Vintage Quote' wearing Deepika Padukone! | दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या ‘या’ विंटेज कोटची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल!

दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या ‘या’ विंटेज कोटची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल!

लिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण नुकतीच मुंबई विमानतळावर बघावयास मिळाली. यावेळी तिने लॉन्ग हायवेस्ट जीन्स आणि व्हाइट टी-शर्टवर विंटेज कोट गाउन घातला होता. त्यावर ब्लॅक गॉगलही घातला होता. यावेळी दीपिकाने ब्राउन लेदर बॅग कॅरी केली होती. हे सर्व सांगण्यामागचे कारण असे की, दीपिकाने जो Burberry ब्रॅण्डचा विंटेज गाउन परिधान केला होता त्यामध्ये ती एकदम कूल दिसत होती. रिपोर्ट्सनुसार या गाउनची किंमत जवळपास दोन लाख रूपये आहे. 



दीपिकाने सध्या चित्रपटांमधून काहीकाळ ब्रेक घेतला असून, सध्या ती फॅमिली टाइम एन्जॉय करीत आहे. चर्चा तर अशीदेखील आहे की, लवकरच ती बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. एका वेबसाइटशी बोलताना दीपिकाच्या फॅमिली एस्ट्रोलॉजरनी सांगितले होते की, १९ नोव्हेंबर हा रणवीर-दीपिकाच्या लग्नासाठी शुभ दिवस आहे. या तारखेवर दोन्ही परिवारांनी सहमती दिल्याचीही चर्चा आता रंगू लागली आहे. 



रणवीर सिंगविषयी सांगायचे झाल्यास सध्या तो ‘सिम्बा’ आणि ‘गल्ली बॉय’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर ‘पद्मावत’नंतर दीपिकाने एकही चित्रपट साइन केला नाही. मात्र अभिनेता इरफान खानसोबत ती विशाल भारद्वाज यांचा ‘सपना दीदी’ हा चित्रपट करणार होती. मात्र इरफानची प्रकृती ठीक नसल्याने या चित्रपटाची शूटिंग थांबविण्यात आली आहे. 

Web Title: You will be shocked to know the price of this 'Vintage Quote' wearing Deepika Padukone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.