गेल्याचवर्षी सुशांतने साजरा केला होता रियाचा वाढदिवस, दिले होते इतके महागडे गिफ्ट, जाणून तुमच्याही डोळ्याला येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 06:19 PM2020-09-09T18:19:58+5:302020-09-09T18:32:07+5:30

रिया चक्रवर्तीने 'मेरे डॅड की मारुती' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरूवात केली होती. तर २०१२ मध्ये तिने तेलगू सिनेसृष्टीत 'तुनेगा-तुनेगा'  सिनेमातून तिने एंट्री केली होती.

You Will Be Amazed to See Rhea Chakraborty Birthday Story Last Year Sushant Singh Rajput Gave Expensive Gifts To Her | गेल्याचवर्षी सुशांतने साजरा केला होता रियाचा वाढदिवस, दिले होते इतके महागडे गिफ्ट, जाणून तुमच्याही डोळ्याला येईल भोवळ

गेल्याचवर्षी सुशांतने साजरा केला होता रियाचा वाढदिवस, दिले होते इतके महागडे गिफ्ट, जाणून तुमच्याही डोळ्याला येईल भोवळ

googlenewsNext

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर रिया चक्रवर्तीलाही आता अटक करण्यात आली आहे.  सुशांतसह असलेल्या तिच्या नात्याबाबत बरीच चर्चा गेली गेली. सुशांतच्या सर्वात जवळची व्यक्ती रिया होती. सुशांतही तिच्या प्रेमात होता.  गेल्या वर्षी रियाचा वाढदिवसाचेही त्याने खास सेलिब्रेशन केले होते. रियाला सुशांतने एक खास भेटही दिली होती.


सुशांतसिंग राजपूतने रियाला प्लॅटिनम पेडेंट भेट दिले होते. रियालाही पेंडंट खूप आवडले होते. रियाला सुशांतने दिलेली भेट अगदी सांभाळून ठेवली आहे. सुशांत आणि रिया चांगली बॉन्डिंग शेअर करत असल्याचे त्यांच्या फोटोना पाहिल्याचे जाणवते. मात्र, या दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याबद्दल कधीच काहीही सांगितले नव्हते. 


रियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती तिच्या वाढदिवसाचा केक कट सेलिब्रेशन करताना दिसली. व्हिडीओमध्ये सुशांतसिंगहॅपी बर्थडे सॉन्ग गात मोठ्या आनंदाने वाढदिवस साजरा करत होते. रियानेही त्या दिवशी ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. नवीन हेअर कट केला होता. खास पद्धतीने रियाचे बर्थ डे सेलिब्रेशन झाल्यानंतर तिने  'धन्यवाद, मी खूप आनंदी आहे, मी खूप आभार मानते असे म्हणत व्हिडीओही शेअर केला होता.


सुशांतसिंग राजपूतनेही याच वर्षी त्याचा 34 वा वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या वाढदिवशी, रियानेही ट्विटर हँडलवर दोघांचा एकत्र फोटो शेअर करत बर्थ डे विश केले होते. या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली होती.  या फोटोत सुशांत आणि रिया एका पार्कमध्ये ग्रीन बेंचवर बसलेले दिसत आहेत. रियाचा एक हात सुशांतच्या खांद्यावर आहे आणि तिच्या चेह-यावर खास वेगळेच हावभावही पाहायला मिळत आहेत. सुशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रियाने त्याला सोन्याचे हृदय असलेला मुलगा म्हटले होते.

 

रिया चक्रवर्तीने 'मेरे डॅड की मारुती' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये अभिनयाला सुरूवात केली होती. तर २०१२ मध्ये तिने तेलगू सिनेसृष्टीत 'तुनेगा-तुनेगा'  सिनेमातून तिने एंट्री केली होती.  यानंतर 'सोनाली केबल' या हिंदी सिनेमातही ती दिसली. या सिनेमात  रिया अली फजलसह झळकली होती. यानंतर ती 'हाफ गर्लफ्रेंड' आणि 'बँक चोर' सारख्या सिनेमातही दिसली. मात्र, रियाची अजूनही बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपड सुरू होती. रिया महेश भट्टच्या 'जलेबी' सिनेमातून चर्चेत आली होती. 

Web Title: You Will Be Amazed to See Rhea Chakraborty Birthday Story Last Year Sushant Singh Rajput Gave Expensive Gifts To Her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.