​होय, कल्की टू होस्ट अ ट्रव्हल शो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 20:45 IST2016-08-03T15:15:03+5:302016-08-03T20:45:03+5:30

कल्की कोचलीन म्हणजे बॉलिवूडची एक गुणी अभिनेत्री. सशक्त अभिनयाच्या जोरावर कल्कीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

Yes, Kalki's host to a trial show! | ​होय, कल्की टू होस्ट अ ट्रव्हल शो!

​होय, कल्की टू होस्ट अ ट्रव्हल शो!

्की कोचलीन म्हणजे बॉलिवूडची एक गुणी अभिनेत्री. सशक्त अभिनयाच्या जोरावर कल्कीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता कल्की एका आगळ्या-वेगळ्या रूपात तुमच्या-आमच्या समोर येणार आहे. होय, कल्की एक नवा कोरा ट्रॅव्हल शो होस्ट करणार आहे. विशेष म्हणजे यात कल्कीचे वडील जोएल कोचलीन हेही तिच्यासोबत दिसणार आहे. कल्की व कल्कीचे वडील असे दोघे बाप-लेक शोचे अँकरिंग करताना दिसतील. उत्तर-पूर्व भारतातील अनेक स्थळांचे दर्शन या शोमधून घडणार आहे.  ४ हजार किमीच्या या अ‍ॅडव्हेंचरस मोटरबाईक राईडमध्ये ३२ वर्षांची कल्की आणि तिचे फोटोग्राफर व बाईकर वडील अनेक स्थळांचे दर्शन घडवतील. निश्चितपणे आजपर्यंत बाईकर, अ‍ॅडव्हेंचरर कल्कीला तुम्ही पाहिले नसेल. आता ती संधी तुम्हा-आम्हाला मिळणार आहे. शिवाय पित्यासोबत कल्कीचे नातेही यानिमित्ताने उलगडणार आहे..

Web Title: Yes, Kalki's host to a trial show!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.