येस...एबीसीडी3 लवकरच..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 17:06 IST2016-04-07T00:06:15+5:302016-04-06T17:06:15+5:30
एबीसीडी, एबीसीडी २ सुपरहिट ठरल्यानंतर रेमो डिसूजाच्या चाहत्यांना एबीसीडी३ ची प्रतीक्षा लागून राहिली आहे. एबीसीडी व एबीसीडी पार्ट टू ...

येस...एबीसीडी3 लवकरच..
ए ीसीडी, एबीसीडी २ सुपरहिट ठरल्यानंतर रेमो डिसूजाच्या चाहत्यांना एबीसीडी३ ची प्रतीक्षा लागून राहिली आहे. एबीसीडी व एबीसीडी पार्ट टू दोन्हीही सुपरहिट ठरले. जुलैमध्ये एबीसीडी २ रिलीज झाला,त्याचवेळी एबीसीडी ३ वर काम सुरु झालेले असल्याचे रेमोने सांगितले होते. आता एबीसीडीच्या दोन्ही सिक्वलमध्ये दिसलेला डान्सर धर्मेश येलांडे यानेही एबीसीडी३ येणारच, ही वार्ता पक्की केली आहे. एबीसीडीच्या दोन्ही सिक्वलेपेक्षा एबीसीडी ३ अधिक भव्यदिव्य असेल. येथे अॅक्टिंगही असेल आणि डान्सिंगही, असे धर्मेश म्हणाला. पहिल्या पार्टपेक्षा दुसरा पार्ट अधिक भव्य होता आणि एबीसीडी ३ त्यापेक्षाही भव्यदिव्य असेल. कुठलीही सिरीज बघा, ती आधीपेक्षा अधिक चांगली झालेली असते. रेमो सरही याच प्रयत्नात आहे. एबीसीडी आणि एबीसीडी२ पेक्षा एबीसीडी ३ बेस्ट व्हावा, अशी रेमो सरांची इच्छा आहे...असे धर्मेश म्हणाला...