यंदाचा आणखी एक दमदार चित्रपट लांबणीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 11:58 IST2017-05-28T06:28:06+5:302017-05-28T11:58:06+5:30

दिग्दर्शक मधूर भांडारकर सध्या अगदी गुपचूपपणे एका चित्रपटावर काम करत आहेत. होय, हा चित्रपट आहे ‘इंदू सरकार’.ना या चित्रटाबद्दल ...

This year, another strong movie is postponed! | यंदाचा आणखी एक दमदार चित्रपट लांबणीवर!

यंदाचा आणखी एक दमदार चित्रपट लांबणीवर!

ग्दर्शक मधूर भांडारकर सध्या अगदी गुपचूपपणे एका चित्रपटावर काम करत आहेत. होय, हा चित्रपट आहे ‘इंदू सरकार’.ना या चित्रटाबद्दल कुठे चर्चा आहे, ना यातील कलाकारांबद्दल कुठले गॉसिप्स. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. होय, हा चित्रपट येत्या २८ जुलैला रिलीज होतो आहे. आधी हा चित्रपट २१ जुलैला रिलीज होणार होता. पण आता ही तारिख आठवडाभर लांबणीवर टाकण्यात आली आहे. अर्थात यामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.



या चित्रपटात  किर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. किर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शीबा चड्ड्ढा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे,



ALSO READ : ​‘इंदू सरकार’ हुबेहुब संजय गांधींसारखा दिसणार नील नितीन मुकेश!

‘इंदू सरकार’ हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहिर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. मधूर भांडारकर यांच्या शब्दांत सांगायचे तर, त्यांनी आणीबाणीदरम्यानची ‘दिल्ली’ या चित्रपटात पुन्हा एकदा जिवंत केली आहे. युवांना आणीबाणी कालखंडाबद्दल माहिती असायला हवी. म्हणून ते हा चित्रपट बनवत आहेत. अनु मलिक आणि बप्पी लाहिरी यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. लवकरच हा चित्रपट आपल्यापुढे असेल.

Web Title: This year, another strong movie is postponed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.