हा स्टारकिड रूपेरी पडद्यावर झळकण्याआधीच ठरतोय हिट, पाहा त्याचे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 14:22 IST2019-12-10T14:20:26+5:302019-12-10T14:22:00+5:30
यशवर्धनने लंडनच्या मेट स्कूलमधून अभिनयाचा कोर्सही केला आहे. मात्र यशवर्धनला सिनेनिर्मितीमध्ये विशेष आवड आहे.

हा स्टारकिड रूपेरी पडद्यावर झळकण्याआधीच ठरतोय हिट, पाहा त्याचे खास फोटो
प्रसिद्धी आणि झगमगाटाच्या दुनियेपासून दूर राहून आपले आयुष्य एन्जॉय करण्याला काही स्टारकिसडस पसंती देतात. बॉलीवुडचा हिरो नंबर वन अभिनेता गोविंदाची चर्चा होते त्यावेळी गोविंदाच्या मुलाची चर्चा नाही झाली तर नवल. कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांची मुलं प्रकाशझोतात आली आहेत. मात्र गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा हा झगमगाटाच्या दुनियेपासून लांबच राहणे पसंत करतो. आपल्या वडिलांप्रमाणेच यशवर्धनसुद्धा स्टायलिश आणि हॅडसम आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला त्याचे डॅशिंग फोटो पाहायला मिळतील. त्याच्या या लूक्समुळेच त्याची सोशल मीडियावर खूप चांगली फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे रूपेरी पडद्यावर एंट्री करण्यापूर्वीच तो सोशल मीडियामुळे हिट ठरतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
यशवर्धनने लंडनच्या मेट स्कूलमधून अभिनयाचा कोर्सही केला आहे. मात्र यशवर्धनला सिनेनिर्मितीमध्ये विशेष आवड आहे. यशवर्धन बॉलीवुडच्या विविध इव्हेंट्सलाही हजर असतो. एकूणच काय तर सध्या बीटाऊनमध्ये यशवर्धनची चर्चा ऐकायला मिळतेय. त्यामुळे यशवर्धनचं डॅशिंग व्यक्तीमत्त्व आणि हॉट अंदाज पाहून त्यानेही लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवावे अशी रसिकांना उत्सुकता आहे.
गोविंदाप्रमाणेच त्याच्या लेकीने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं हे सा-यांनाच माहिती आहे. मात्र तिला म्हणावं तसं यश काही मिळालं नाही. त्यामुळे यशवर्धनने रूपेरी पडद्यावर नशीब आजमवणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.