'द रेल्वे मॅन' संदर्भात मोठी अपडेट, 'या' दिवशी रिलीज होणार भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित वेब सीरिज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 05:01 PM2023-10-26T17:01:07+5:302023-10-26T17:06:08+5:30

भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित वेब सीरिजच्या तारखेबाबत अपडेट समोर आले आहे. 

Yash Raj Films’ maiden web-series ‘The Railway Men’ to stream on Netflix from November 18 | 'द रेल्वे मॅन' संदर्भात मोठी अपडेट, 'या' दिवशी रिलीज होणार भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित वेब सीरिज

'द रेल्वे मॅन' संदर्भात मोठी अपडेट, 'या' दिवशी रिलीज होणार भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित वेब सीरिज

प्रसिद्ध अभिनेता आर माधवनची बहुचर्चित वेब सीरिज 'द रेल्वे मॅन' गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेवरून प्रेरित या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रतिक्षा संपली असून सीरिजच्या रिलीजच्या तारखेबाबत अपडेट समोर आले आहे. 

नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'द रेल्वे मॅन' चा मोशन व्हिडिओ शेअर केला. 18 नोव्हेंबर रोजी ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान हा 'द रेल्वे मॅन' वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 

यशराज बॅनरखाली बनलेली 'द रेल्वे मॅन' ही वेबसिरीज भोपाळ गॅस दुर्घटनेच्या सत्य घटनेपासून प्रेरित आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात 1984 मध्ये झालेल्या  गॅस दुर्घटनेत अडकलेल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घातला होता. त्यांची स्टोरी वेबसीरिजमध्ये पाहायला मिळेल. तर ही वेबसीरिज 4 एपिसोडमध्ये स्ट्रीम केली जाईल. यात आर. माधवन, के के मेनन, दिव्येंदु शर्मा आणि बाबिल खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 भोपाळ गॅस गळती ही भारतातील सर्वांत मोठी औद्योगिक दुर्घटना म्हणून ओळखली जाते. युनियन कार्बाइड नावाच्या कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली. सरकारी आकडेवारीनुसार या दुर्घटनेनंतर काही तासांमध्येच जवळपास 3,000 लोकांचा मृत्यू झाला होता. तो भीषण प्रसंग आठवला की पीडितांचे डोळे अजूनही पाणावतात.

Web Title: Yash Raj Films’ maiden web-series ‘The Railway Men’ to stream on Netflix from November 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.