Congratulations! यामी गौतमने उरीच्या दिग्दर्शकासोबत केले लग्न, पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 18:41 IST2021-06-04T18:20:30+5:302021-06-04T18:41:15+5:30

यामीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत ही गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे.

yami gautam married to uri the surgical strike director aditya dhar | Congratulations! यामी गौतमने उरीच्या दिग्दर्शकासोबत केले लग्न, पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

Congratulations! यामी गौतमने उरीच्या दिग्दर्शकासोबत केले लग्न, पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

ठळक मुद्देयामीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, आम्ही आमच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज लग्नबंधनात अडकलो.

अभिनेत्री यामी गौतम नुकतीच लग्नबंधनात अडकली असून तिनेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तिने दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले आहे. आदित्यने काबूल एक्सप्रेस, हाल ए दिल यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली आहेत तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे.

यामीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत त्यासोबत लिहिले आहे की, आम्ही आमच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज लग्नबंधनात अडकलो. मैत्रीपासून सुरू झालेल्या  या प्रवासाला आज एक नवे वळण मिळाले. 

यामीने उरी द सर्जिकल स्ट्राईक या आदित्यने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. 

Web Title: yami gautam married to uri the surgical strike director aditya dhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.