Wow ! काळाप्रमाणे इतकी बोल्ड आणि ग्लॅमरस झाली दिशा पटानी, पूर्वी दिसायची अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 01:47 PM2020-02-07T13:47:48+5:302020-02-07T13:55:06+5:30

दिशा पटानीने आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

Wow ! Disha Patani looks unrecognisable in her old photoshoot, see pics | Wow ! काळाप्रमाणे इतकी बोल्ड आणि ग्लॅमरस झाली दिशा पटानी, पूर्वी दिसायची अशी

Wow ! काळाप्रमाणे इतकी बोल्ड आणि ग्लॅमरस झाली दिशा पटानी, पूर्वी दिसायची अशी

googlenewsNext

मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अभिनेत्रींसाठी महत्त्वाच्या ठरतात.आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब प्रत्येकाला लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे कलाकार मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत. बॉलिवूडमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. मेकओव्हरमुळे अनेकांची नशीब पालटल्याची अनेक उदाहरणं आहेत.

सध्या दिशा पटानीही तिच्या या मेकओव्हरमुळेच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर दिशा पटानी सतत सक्रीय असून तिचे एक से बढकर एक फोटोशूट करत सा-यांची वाहवा मिळत असते. तिच्या या फोटोंची बात काही औरच असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. 


सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे दिशाचा बोलबाला असतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कधी बिकनी तर कधी टॉपलेस अशा अंदाजात ती फोटोशूट करत सा-यांची पसंती मिळवत असते. आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.

 

 

तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे. मात्र तिच्या करिअरच्या सुरूवातीच्या लूकवर नजर टाकली तर तिच्यात तुम्हाला कमालीचा बदल जाणवेल. अगदी साधारण लूकमध्ये तिचे हे फोटो आणि आत्ताचे फोटो पाहून तुम्हालाही तिचा मेकओव्हरवर केलेली मेहनत जाणवेल.विशेष म्हणजे तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.   

Web Title: Wow ! Disha Patani looks unrecognisable in her old photoshoot, see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.