​कोणासोबत करतेय काजोल तामिळ चित्रपटात काम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2016 12:22 IST2016-12-16T12:16:47+5:302016-12-16T12:22:23+5:30

तब्बल वीस वर्षांनंतर काजोल पुन्हा एकदा तामिळ चित्रपटात काम करण्यास सज्ज झाली आहे. सुपरस्टार धनुषसोबत ‘वेलैइला पट्टाटथरी २’ (व्हीआईपी ...

Working with Kajol Tamil film? | ​कोणासोबत करतेय काजोल तामिळ चित्रपटात काम?

​कोणासोबत करतेय काजोल तामिळ चित्रपटात काम?

्बल वीस वर्षांनंतर काजोल पुन्हा एकदा तामिळ चित्रपटात काम करण्यास सज्ज झाली आहे. सुपरस्टार धनुषसोबत ‘वेलैइला पट्टाटथरी २’ (व्हीआईपी २) या चित्रपटाद्वारे ती पुनरामगन करणार आहे. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या या सिनेमाचे दिग्दर्शन क रतेय.

काजोलने १९९७ साली ‘मिनसारा कनावू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रमध्ये पदार्पण केले होते. यामध्ये तिच्यासोबत अरविंद स्वामी आणि प्रभू देवा होते. ए. आर. रेहमान यांच्या संगीताने नटलेला हा चित्रपट त्यावेळी बॉक्स आॅफिवर हीट ठरला होतो. सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली होती. 

‘वेन्निलावै’, ‘पू पूकम ओसाई’ आणि ‘मन्न मदुराई’ या गाण्यांमधील काजोलच्या अदांनी तामिळ प्रेक्षकांचे मन जिंकले होते. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी कॉलीवूडशी नाते पुढे चालू नाही ठेवले.

                                   
                                   मिनसारा कनावू :  प्रभू देवा, काजोल आणि अरविंद स्वामी

परंतु आता २० वर्षांनंतर ती ‘वेलैइला पट्टाटथरी’ (२०१४) या सिनेमाच्या रिमेकमधून पुन्हा एकदा एन्ट्री करणार आहे. 

या चित्रपटात तिची भूमिका काय असेल याबाबत फारशी माहिती उपलब्ध नसून लवकरच ती ‘व्हीआईपी २’ टीमला जॉईन होणार आहे. चित्रपटाची चेन्नईमध्ये शूटींग सुरू झाली असून रजनीकांत यांनी मुहूर्त शॉटसाठी क्लॅप केले.

                                   
                                   पोस्टर : वेलैइला पट्टाटथरी २’ (व्हीआईपी २)

                                   
                                   मुहूर्त शॉट : रजनीकांत

पहिल्या चित्रपटातील जवळपास सर्वच कलाकार पुन्हा आपापल्या भूमिका करणार आहेत. त्यात काजोलची भर पडणार आहे. याबरोबरच साऊथ अ‍ॅक्टर्स विवेक, अमला पौल, समुथीराकानी हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

बॉलीवूडमध्ये काजोल शेवटची रोहित शेट्टीच्या ‘दिलवाले’मध्ये दिसली होती. यामध्ये तिची शाहरुखसोबत जोडी पुन्हा एकदा जमून आली होती. त्यांची जादू कायम राखत चित्रपटाने शंभर कोटींपेक्षा जास्त गल्ला जमावला होता.

Web Title: Working with Kajol Tamil film?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.