​माझ्याच वयाच्या ‘खलनायकांना’ वैतागून मी हिंदी सिनेमा सोडला- तेज सप्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 10:04 AM2018-01-18T10:04:51+5:302018-01-18T15:34:51+5:30

दोनेशेवर चित्रपटात नायक आणि खलनायकाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू लवकरच ‘डिस्कव्हरी जीत’ या वाहिनीवरच्या एका नव्या को-या ...

Woefully to the villagers of my age, I left Hindi cinema - Sharp Sapru | ​माझ्याच वयाच्या ‘खलनायकांना’ वैतागून मी हिंदी सिनेमा सोडला- तेज सप्रू

​माझ्याच वयाच्या ‘खलनायकांना’ वैतागून मी हिंदी सिनेमा सोडला- तेज सप्रू

googlenewsNext
नेशेवर चित्रपटात नायक आणि खलनायकाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू लवकरच ‘डिस्कव्हरी जीत’ या वाहिनीवरच्या एका नव्या को-या शोमध्ये दिसणार आहे. ‘स्वामी रामदेव: एक संघर्ष’ असे या मालिकेचे नाव. स्वामी रामदेव यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या मालिकेत तेज सप्रू यांनी गोवर्धन महाराज ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. येत्या १२ फेबु्रवारीपासून प्रसारित होणाºया या मालिकेच्या निमित्ताने तेज सप्रू यांनी लोकमत कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांच्याशी मारलेल्या गप्पांचा हा प्रश्नोत्तर स्वरूपातील वृत्तांत...

- ‘स्वामी रामदेव: एक संघर्ष’ मालिकेत आपली भूमिका नेमकी काय?
तेज सप्रू : या मालिकेत मी गोवर्धन महाराज या जमिनदाराची भूमिका साकारली आहे. स्वामी रामदेव यांचे बालपण अतिशय कष्टात गेले. शिकण्याची आवड असूनही त्यांना फार शिकता आले नाही आणि गोवर्धन महाराज याला कारणीभूत ठरला. भूमिका नेगटीव्ह आहे. पण यानिमित्ताने का होईना बाबा रामदेव यांची अप्रत्यक्षपणे सेवा करण्याची संधी मिळणे, हे माझे सुदैव आहे.

-आपण २०० वर चित्रपटांत काम केले आणि अचानक चित्रपट सोडून टीव्हीकडे वळलात. यामागे काही खास कारण?
तेज सप्रू : होय, खास कारण तर होतेच. एक - दोन चित्रपटांत हिरोचे रोल केल्यानंतर मला विलेनचे रोल आॅफर होऊ लागले. विलेनचे रोलही मी आनंदाने स्वीकारले. माझ्या प्रत्येक चित्रपटात मी स्वत: अ‍ॅक्शन केली. मग ती तिसºया माळ्यावर उडी मारणे असो वा आणखी काहीही. पण कालांतराने मी अ‍ॅक्शन करतो म्हणून माझ्या वयाच्याच अभिनेत्याचा मुलगा बनून वावरण्याची वेळ माझ्यावर  आली. प्रेम चोप्रा, परेश रावल, गुलशन ग्रोवर सगळ्े माझ्याच वयाचे. पण ते पांढºया केसांचा विग चढवून कॅमेºयासमोर उभे होत. जेणेकरून त्यांना अ‍ॅक्शन करावी लागू नये. याचा मला वैताग आला आणि मी चित्रपटांना बाय बाय केले. छोट्या पडद्यावर मला चांगले रोल मिळालेत आणि मी माझ्या याच करिअरमध्ये रमलो. पण अर्थात आजही चित्रपटाची चांगली आॅफर आली तर मी ती नक्की स्वीकारेल.

छोटा पडदा व मोठा पडदा या दोन्ही ठिकाणी काम करताना काय मुख्य फरक जाणवतो.
तेज सप्रू : फरक असतो तो तांत्रिकदृष्ट्या. अर्थात त्यामुळे येथे अधिक तास काम करावे लागते. पण माझ्यामते, या दोन्ही माध्यमात आता तसा फार मोठा फरक उरलेला नाही. टेलिव्हिजन इंडस्ट्री बरीच मोठी झाली आहे. तांत्रिकदृष्ट्या बॉलिवूडपेक्षा कुठेही ही इंडस्ट्री कमी नाही. त्यामुळे मला तसा फार फरक जाणवत नाही.

तेज सप्रू : आपल्याला खेळात रूची होती आणि त्यातच करिअर करायचे होते, हे खरेयं का?
होय अगदी खरेय. मी स्पोर्टमॅन होतो. क्रिकेट बॅडमिंटन माझा जीव की प्राण होता. एकदिवस वडिल डी. के. सप्रू यांनी मला बोलवले आणि रविकांत यांना ‘सुरक्षा’ साठी एक हिरो पाहिजे आहे. एक मिथुन आहे आणि दुसºयाचा त्यांना शोध आहे. त्यांना जावून भेट, असे सांगितले. मी रविकांत यांना भेटायला गेलो. त्यांनी मला दूरूनच बघितले अन् हाच माझा हिरो, म्हणून मला साईन केले. अशाप्रकारे मी अ‍ॅक्टर झालो. पण खरे सांगायचे तर त्याकाळात शूटींग करत असतानाही माझे अर्धे मन खेळाच्या मैदानावरच असायचे.

- सध्याच्या चित्रपटांचे स्वरूप बदलले आहे. याबद्दल काय विचार करता?
तेज सप्रू : तांत्रिकदृष्ट्या चित्रपट अतिशय प्रगत झालेत, याचा मला आनंद आहे. नवे कलाकार, त्यांना यानिमित्ताने मिळणारे व्यासपीठ या सगळ्यांचा आनंदच आहे. पण मला एका गोष्टीचे मनापासून वाईट वाटते. ती म्हणजे, आजच्या चित्रपटांचे संगीत. आजच्या   गाण्यांमधला ‘प्राण’चं निघून गेलाय. आधीची गाणी अर्थपूर्ण असत. आजही ती ऐकली की, त्यात रमायलां होतं. पण अलीकडची गाणी डोक उठवतात.

- आज चित्रपट असो वा मालिका प्रत्येकासाठी आक्रमक प्रमोशन स्ट्रॅटेजी वापरली जाते. आपले काय मत आहे, याबदद्ल?
तेज सप्रू : प्रमोशनशिवाय काहीच विकल्या जाणार नाही, ही स्थिती आहे आणि याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. माझ्या मते, तुमची कलाकृती आणखी अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम या नात्याने प्रमोशन मला मान्य आहे. त्यात काहीही वाईट नाही.

Web Title: Woefully to the villagers of my age, I left Hindi cinema - Sharp Sapru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.