​बॉलिवूड चित्रपटांना पडली हिवाळ्याची भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 17:41 IST2016-12-04T17:41:19+5:302016-12-04T17:41:19+5:30

हिवाळा म्हटलं की सर्वांना आठवतो तो काश्मीर किंवा हिमालयाच्या पर्वतरांगात पडणारा बर्फ. अशा बर्फाळ प्रदेशात फुलणारं प्रेम दाखविण्याची संधी ...

Winter fall in Bollywood movies | ​बॉलिवूड चित्रपटांना पडली हिवाळ्याची भुरळ

​बॉलिवूड चित्रपटांना पडली हिवाळ्याची भुरळ

ong>हिवाळा म्हटलं की सर्वांना आठवतो तो काश्मीर किंवा हिमालयाच्या पर्वतरांगात पडणारा बर्फ. अशा बर्फाळ प्रदेशात फुलणारं प्रेम दाखविण्याची संधी बॉलिवूड दडवणार नसेल तर मग कसे. सिनेमा हे मनोरंजनाचे साधन आहे. प्रणयदृष्याचे सीन दाखविताना मग अशा विविध लोकेशन्सचा वापर करण्यात येतो. पूर्वी काश्मीरची निवड केली जायची. आता देश-विदेशातील स्थळांचा वापर केला जातो.  झाडांभोवती घिरट्या घालणे, प्रेमात पडणे व हातात हात घालून एकमेकांसोबत फिरणे असो किंवा अ‍ॅडव्हेंचरस सफर असो, हिंदी चित्रपटातील आवडता ॠ तू म्हणजे हिवाळा. अनेक चित्रपटातून हिवाळ्यात फुलणारे प्रेम दाखविण्यात आले आहे. चित्रपटातून प्रेक्षकांनी अनुभवलेल्या हिवाळ्याची ही माहिती...

Bollywood Films That Capture The Essence Of Winter - Rockstar

रॉकस्टार :  इम्तियाज अली याने दिग्दर्शित केलेल्या ‘रॉकस्टार’ या चित्रपटात दिल्लीच्या जनार्दन या युवकाची कथा दाखविण्यात आली होती. दिल्लीची थंडी दाखविण्यासाठी नायक जनार्दन व नायिका हीर हिच्या कॉश्चुमचा आधार घेतला. दिल्ली युनिव्हर्सिटी माध्यमातून दाखविलेली हिवाळ्याची सकाळ, पडलेले धुके, निजामऊद्दीन दर्ग्यामधील रात्रीची थंडी हे अतिशय खुबीने त्याने दाखविली आहे. यासोबतच काश्मीरच्या पहेलगाम येथील हिवाळ्यातील बेताब व्हॅली, देवदारची झाडे यासोबतच वातावरणाचा चित्रपटातील कथानक समोर घेऊन जाण्यासाठी चांगला वापर केला आहे. 

Bollywood Films That Capture The Essence Of Winter - Lootera

लुटेरा : अमेरिकन लेखक ओ हेन्री यांच्या ‘द लास्ट लीफ’ या कथेवर आधारित विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ‘लुटेरा’ या चित्रपटाची समीक्षकांनी प्रशंसा केली. रणवीर सिंग व सोनाक्षी सिन्हा अभिनीत या चित्रपटात हिवाळ्याचा संदर्भ अतिशय मार्मिक पद्धतीने घेतला आहे. पश्चिम बंगालच्या एका खेड्यातून सुरू होणारी प्रेमकथा हिमालयाच्या कुशीत असलेल्या डलहौसीपर्यंत पोहोचते. हिवाळ्यातील बर्फाच्छादित शिखरे, खिडकीबाहेर दिसणारा स्नो फॉल, हिवाळ्यात येणारा थंड हवेचा आवाज, परसरलेले धुके क थेला अधिक प्रभावी करतात. स्नोफॉलमध्ये झाडांची होणारी पानगळ जीवनाचा सारांशच सांगून जातो. 

Bollywood Films That Capture The Essence Of Winter -Barfi

बर्फी : दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या ‘बर्फी’ या चित्रपटाची शूटिंग पर्वतांची राणी मानल्या जाणाºया दार्जिलिंग येथे करण्यात आली आहे. मुकबधीर बफर् ी, सुंदर दिसणारी श्रृती व गतीमंद झिलमील यांच्या भावनात्मक कथेला ऋ तूंचा आधार देण्यात अनुराग बासू यशस्वी ठरला आहे. सामाजिक रुढी, संस्कृती व शरीराच्या भौतिक क्षमतेचा परिचय देणारी आहे. या चित्रपटातील काही दृष्ये उटी व कोलकाता येथे चित्रित करण्यात आली असली तरी हिवाळा व थंडीचे चित्रण करण्यात दिग्दर्शकाने कुचराई केली नाही. थंडीने थरथरणारी झिलमील व बर्फी यांची कथा सकाळी धुक्यात सुरू होते मध्यरात्रीच्या धुक्यापर्यंत पोहोचते.

Bollywood Films That Capture The Essence Of Winter - Black

ब्लॅक : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘ब्लॅक’ हा चित्रपट अंध व मुकबधीर मुलीची कथा असलेला क्लासिक चित्रपट आहे. अंध व मुकबधीर पियानोवादक हेलन किलर यांच्या जीवनाशी साम्य असलेला हा चित्रपटातून मूक संवेदनांना दाखविण्याचा सर्वस्वी प्रयत्न भन्साळी यांनी केलाय. या संवेदना दाखविण्यासाठी त्यांनी हिवाळा व स्नोफॉलचा केलेला वापर हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कथेला अधिक प्रभावी करण्यासाठी भन्साळी यांनी शिमल्याची निवड केली. हिवाळ्यात शिमल्याचे वातावरण चित्रपटाची कथा समोर घेऊन जाणारे आहे. चित्रपटातील मुख्य पात्र मिशेल व तिचे शिक्षक मिस्टर सहाय एका बेंचवर बसलेले असताना होणारा स्नोफॉल स्पर्शाची भावना दाखविण्याचा चित्रपटसृष्टीतील सर्वांत चांगल्या दृष्यात समाविष्ट झालाय. 

Bollywood Films That Capture The Essence Of Winter - Ye jawani hai diwani

ये जवानी है दिवानी : अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट प्रेमाचा शोध घेणारा चित्रपट आहे. चित्रपटाची क था फारशी वेगळी नसली तरी त्याला दाखविण्याचा केलेला प्रयत्न खरोखरच चांगला आहे. नयना व कबीर यांची भेट हिमालयात ट्रॅकिंग दरम्यान होते. हिवाळ्यात १० डिग्री सेल्सिअस तापमानात चित्रपटाची शूटिंग करण्यात आली आहे. हिवाळ्यात दोघांत फुलणारे प्रेमांकुर दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. 

Bollywood Films That Capture The Essence Of Winter -chandni

यश चोपडा 
यश चोपडा यांनी आपल्या चित्रपटात हिवाळा आणि प्रेमाचा संबंध चांगलाच जोडला आहे. दाग, सिलसिला, चांदनी, डर, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, लम्हे या चित्रपटात त्यांनी रोमांस दाखविण्यासाठी हिवाळ्याचा आधार घेतला आहे. चांदनी या चित्रपटाची सुरुवातच हिवाळ्यापासून होते. सिलसिलामध्ये रेखा व अमिताभ यांच्यातला प्रणय हिवाळ्यात बहरत जातो. 

गुलझार
गुलझार यांचे ॠ तूप्रेम सर्वज्ञात आहे. त्याचे मौसम या चित्रपटातील गाण्यात त्यांनी ‘जाडो की नर्म धूप’ असा शब्द प्रयोग करून हिवाळ्याची महतीच वर्णन केली आहे. माचिस या चित्रपटात काश्मीर खोºयातील थंडीचा कथानक म्हणून आधार घेतला आहे. 


Web Title: Winter fall in Bollywood movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.