​सलमान व कॅट ‘चॅट शो’साठी येणार का एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 17:43 IST2016-11-16T17:43:28+5:302016-11-16T17:43:28+5:30

कॅटरिना आणि सलमान खान या दोघांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे . होय, सगळी चर्चा सुरळीत मार्गी लागली तर ...

Will Salman and Kat get together for 'chat show'? | ​सलमान व कॅट ‘चॅट शो’साठी येणार का एकत्र?

​सलमान व कॅट ‘चॅट शो’साठी येणार का एकत्र?

टरिना आणि सलमान खान या दोघांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे . होय, सगळी चर्चा सुरळीत मार्गी लागली तर सलमान व कॅट दोघेही एका चॅट शोमध्ये एकत्र दिसतील. ताज्या बातमीनुसार, एका चॅनलने यासंदर्भात कॅट व सलमानशी संपर्क साधला आहे. हा चॅट शो कुठला? हे अद्याप कळलेले नाही. कारण सध्या विविध चॅनलवर अनेक चॅट शो  सुरु आहेत. ‘कॉफी विद करण’, नेहा धूपियाचा ‘नो फिल्टर नेहा’ शिवाय साजिद खान व रितेश देशमुख यांचा ‘यारों की बारात’ असे अनेक चॅट शो सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे चॅट शो कुठला ते सांगता येणार नाही. पण चॅट शोची आॅफर मिळाल्याची बातमी मात्र खरी आहे. अर्थात अद्याप कॅट वा सलमान यापैकी कुणीही तूर्तास तरी या प्रस्तावाला होकार दिलेला नाही.  
 काही जाणकारांच्या मते, रणबीरसोबतच्या ब्रेकअपमुळे कॅटरिनाच्या करिअरवर काहीसा परिणाम झाला आहे. अशास्थितीत या चॅट शोमुळे कॅट या ना त्याप्रकारे चर्चेत येऊ शकेल. एकेकाळी सलमान आणि कॅटच्या अफेअरचीही चर्चा होती. खरे तर ब्रेकअपनंतर कपल एकमेकांना टाळताना दिसतात. पण कॅट व सलमान यांनी कधीच एकमेकांना टाळले नाही.(तसेही सलमानचे त्याच्या ‘एक्स गर्लफ्रेन्ड’शी चांगले संबंध आहेत. संगीता बिजलानीसोबत आजही सलमानची मैत्री टिकून आहे.)  कॅट व सलमान लवकरच ‘टायगर जिंदा है’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अशास्थितीत चॅट शोला एकत्र हजेरी लावण्यात त्यांना काहीही संकोच नको. आता नेमके काय होते, ते बघूच. शेवटी कॅट व सलमान चॅट शोमध्ये एकत्र आले तर चाहत्यांना आवडणार, हे तेवढेच खरे!

Web Title: Will Salman and Kat get together for 'chat show'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.