बरे झाल्यानंतर काम मिळेल का?, ऋषी कपूर यांना होती चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 05:04 AM2020-05-01T05:04:13+5:302020-05-01T05:04:23+5:30

आजारातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा अभिनय करायचा होता. मात्र, ठणठणीत बरे झाल्यानंतर मला काम मिळेल का?

Will he get a job after recovery ?, Rishi Kapoor was worried | बरे झाल्यानंतर काम मिळेल का?, ऋषी कपूर यांना होती चिंता

बरे झाल्यानंतर काम मिळेल का?, ऋषी कपूर यांना होती चिंता

googlenewsNext

मुंबई : ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यू यॉर्कमधून कॅन्सरचा उपचार करून मुंबईत परतले. आजारातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा अभिनय करायचा होता. मात्र, ठणठणीत बरे झाल्यानंतर मला काम मिळेल का? भूमिका मिळतील का? ही चिंता त्यांना सतावत होती. रणबीर कपूरने एका पुरस्कार सोहळ्यात त्यांची ही चिंता बोलून दाखवली होती.
ऋषी कपूर नेहमीच सोशल मीडियावर आपल्या विचारांना वाट मोकळी करून देताना दिसले. डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. या काळात पत्नी नीतू, मुलगी रिद्धिमा आणि मुलगा रणबीर सावलीसारखे त्यांच्यासोबत होते. रिद्धिमाचा सुखाचा संसार ते पाहत होतेच; पण रणबीरचे लग्न पाहण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.
भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘पहिले घराणे’ म्हणून लौकिक असणाऱ्या कपूर घराण्यात जन्मलेल्या ऋषी कपूर याने सिनेसृष्टीला प्रदीर्घ काळ मोठे योगदान दिले. चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण कालखंडात अनेक दिग्गज अभिनेते व महानायकांच्या मांदियाळीत ऋषी कपूर यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला. यातच त्यांचे श्रेष्ठत्व दिसते. इरफान खान यांच्या मागोमाग ऋषी कपूर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. या दु:खद प्रसंगी राज्यातील जनतेच्या वतीने मी आपल्या शोकसंवेदना कपूर कुटुंबीयांना कळवितो.
- भगतसिंह कोश्यारी (राज्यपाल)
>अभिनयातील मानदंड पृथ्वीराज कपूर,
द ग्रेट शो-मन राज कपूर यांच्या कुटुंबाने भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान विसरता येण्यासारखे नाही. कुटुंबाचा हा वारसा ऋषी कपूर यांनी समर्थपणे पेलला.
ते सहजसुंदर अभिनेता होते, तितकेच परखड आणि प्रांजळ व्यक्ती होते. रंगभूमी, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी आपल्या चिरतरुण व्यक्तिमत्त्वाप्रमाणे सर्जनशील ठसा उमटविला. चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीसाठी ते आश्वासक मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने कलाकारांच्या दोन पिढ्यांना जोडणारा दुवा निखळला. भारतीय कला क्षेत्राची हानी झाली आहे.
- उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री)
>ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार अभिनेता आपण गमावला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, परंतु त्या वेदना त्यांनी रसिकांना जाणवू दिल्या नाहीत. जीवनाच्या अखेरपर्यंत चित्रपटसृष्टीशी आणि रसिकांशी नाते, संपर्क कायम राखलेले ते कलावंत होते. काल इरफान खान यांचे निधन झाल्यानंतर आज ऋषी कपूर यांच्या निधनाची आलेली बातमी, हे खरोखरंच धक्कादायक, वेदना देणारे आहे.
- अजित पवार (उपमुख्यमंत्री)
>भारतीय चित्रपटसृष्टीला
अमूल्य योगदान दिलेल्या कपूर घराण्याचा समृद्ध वारसा लाभलेला एक सदाबहार तारा ऋषी कपूर यांच्या निधनाने आज निखळला. चतुरस्र अभिनेता इरफान खान यांच्या निधनाच्या धक्क्यातून चित्रपटसृष्टी सावरण्याआधीच ऋषी कपूर यांच्या निधनाची दु:खद बातमी आली. ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयातून वेगळी छाप सोडली होती.
- बाळासाहेब थोरात
(महसूल मंत्री)
>दोन दिवसांत दोन महान कलावंत आपल्याला सोडून गेले. ते आपल्यात नाहीत याची अस्वस्थता आहे. इरफान खान यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य कलेसाठी वाहिले, तर कपूर कुटुंबीय व देशातील जनतेचे नाते हे आगळेवेगळे आहे. ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत. दोन्ही महान कलाकारांना श्रद्धांजली व कृतज्ञता अर्पण करतो.
- शरद पवार
(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)
>ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाचे
वृत्त दु:खद आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांनी दीर्घ काळ चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- अशोक चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री)
ऋषी कपूर यांच्या निधनाने बहुमुखी प्रतिभेचा अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आपण गमावला. भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे. सांत्वनासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. ऋषी कपूर यांचे चाहते, मित्र आणि कुटुंबीयांना बळ मिळो.
- देवेंद्र फडणवीस
(विरोधी पक्षनेते, विधानसभा)
>कोरोना आणि लॉकडाउनमुळे अनेकांना
मनात असूनही ऋषी कपूर यांचे अंत्यदर्शन
घेता आले नाही. याबाबत दु:ख व्यक्त करत
टिष्ट्वटरच्या माध्यमातून अनेक मान्यवरांनी या अष्टपैलू अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांना शब्दपुष्प अर्पण केले.
>विश्वास बसत नाही. चिंटूजी हसतमुख स्वभावाचे होते. आमच्यात प्रेम आणि सन्मानाचे नाते होते. या मित्राची खूप आठवण येईल. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
- कमल हासन
>तो गेला. ऋषी कपूर आपल्यातून निघून गेला.
तो आत्ताच गेला आहे. मी उद्ध्वस्त झालो आहे.
- अमिताभ बच्चन
>सकाळी ही बातमी आल्यापासून रडतोय. मी माझा मित्र गमावला आहे. मी त्यांच्यासोबत पाच सिनेमे केले. अत्यंत उत्तम अभिनेता, निर्मळ माणूस अशी ऋषी कपूर यांची प्रतिमा होती. त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे. - डेव्हिड धवन
> बॉलीवूडने आज आपल्या सुपरस्टारला गमावले आहे. त्यांनी अनेक उत्तम सिनेमे आपल्याला दिले. त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान खरेच खूप मोठे आहे. ऋषीजी मी तुम्हाला खूप मिस करेन.
- आमिर खान
>रेस्ट इन पीस चिंटू सर. चूकभूल माफ करावी. कुटुंब आणि मित्रांना हे दु:ख सहन करण्याची हिंमत द्या, शांती द्या. - सलमान खान
>काल इरफानच्या निधनाची बातमी मिळाली
आणि आज ऋषी गेल्याचे कळले. मी काय बोलू तेच कळत नाही. माझा भाऊ गेला. नेहमी फोन करून माझ्या तब्येतीची चौकशी करायचा. आयुष्याची विडंबना तर पाहा. त्याचे अंत्यदर्शनही आम्ही घेऊ शकत नाही. त्याच्या घरीही जाऊ शकत नाही. - रझा मुराद
>माझा चिंटू डार्लिंग आज गेला. माझा जवळचा मित्र, माझा सहकलाकार आणि माझा सवंगडी मला सोडून गेला. मी रडेपर्यंत तो मला हसवायचा. आता फक्त अश्रू ठेवून गेलाय.
- सिमी गरेवाल
>ऋषी कपूर काय कमाल ऊर्जा घेऊन तुम्ही आजवर वावरलात. तुमच्यासारखा कलावंत कधीच मरत नाही ऋषीजी. तुम्ही नेहमीच जिवंत आहात आमच्या मनात आणि तेही कायमचे.
- सुबोध भावे
>असे वाटतेय की मी खूप वाईट स्वप्न पाहतोय. ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी खूप चटका लावणारी आहे. ऋषी कपूर खूप चांगले मित्र होते. माझ्या कुटुंबाचे खूप जवळचे होते. त्यांच्या जाण्याने मला खूप मोठा धक्का बसला आहे. मी कपूर कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. - अक्षय कुमार
>मी आज खºया अर्थाने माझा हीरो गमावला. त्यांच्यासोबत मी तीन सिनेमांत काम केले. ‘हीना’ सिनेमात मी अगदीच नवखी होते. मात्र त्यांनी अगदी सहजपणे मला दिलासा दिला आणि सांभाळूनही घेतले. आपण सगळ्यांनीच आपल्या लाडक्या चॉकलेट हीरोला गमावले आहे. - अश्विनी भावे

Web Title: Will he get a job after recovery ?, Rishi Kapoor was worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.