​‘हे’ असेल शाहरूख, अनुष्का व कॅटरिनाच्या आगामी चित्रपटाचे नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 12:57 IST2017-06-04T07:27:15+5:302017-06-04T12:57:15+5:30

शाहरूख खान व अनुष्का शर्मा या दोघांनी अलीकडेच इम्तियाज अलीच्या चित्रपटाचे (या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. आधी त्याचे ...

'This' will be the name of Shah Rukh, Anushka and Katrina's forthcoming film! | ​‘हे’ असेल शाहरूख, अनुष्का व कॅटरिनाच्या आगामी चित्रपटाचे नाव!

​‘हे’ असेल शाहरूख, अनुष्का व कॅटरिनाच्या आगामी चित्रपटाचे नाव!

हरूख खान व अनुष्का शर्मा या दोघांनी अलीकडेच इम्तियाज अलीच्या चित्रपटाचे (या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. आधी त्याचे नाव ‘दी रिंग’ असे सांगितले गेले. यानंतर ‘रहनुमा’ असे असल्याचे कळते.) शूटींग संपवले.  शाहरूख व अनुष्काच्या या चित्रपटाचे नाव तर आपल्याला ठाऊक नाही. पण शाहरूख, अनुष्का आणि कॅटरिना कैफ या तिकडीच्या आगामी सिनेमाचे नाव मात्र आम्ही तुम्हाला सांगू शकू.  होय, आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरूख, अनुष्का व कॅटरिना ही तिकडी एकत्र येत आहे. या चित्रपटाचे नाव फायनल झाले आहे. या चित्रपटाचे नाव ‘रंगरेज’ असे असणार आहे. यात एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, इम्तियाज अली हा सुद्धा आपल्या आगामी चित्रपटाचे नाव हेच ठेऊ इच्छित होता. पण इम्तियाजच्या आधी आनंद एल रायने हे नाव फायनल केले आहे. अर्थात चित्रपटाच्या या शीर्षकाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच ती होईल, अशी अपेक्षा आहे. या चित्रपटात शाहरूख खान एका खुज्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे.

ALSO READ : आलिया भट्टने चलाखीने टाळला शाहरूख खानचा चित्रपट!

या चित्रपटासाठी आधी दीपिका पादुकोणचे नाव आघाडीवर होती. पण चर्चा खरी मानाल तर कॅटरिनानेच या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट केला. दीपिका व कॅटरिनाचे पटत नाही, हे तुम्हाला ठाऊक आहेच. रणबीर कपूरच्या प्रकरणापासून दोघींमध्ये धुसफूस सुरु आहे. याच कारणाने आनंद एल राय यांनी कॅटरिनाच्या म्हणण्यावरून या चित्रपटात अनुष्काला घेतले. म्हणजेच ‘जब तक हैं जान’नंतर ही तिकडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. आनंद एल राय यांनी यापूर्वी ‘रांझणा’ व ‘तनु वेड्स मनु’ यासारखे हिट चित्रपट दिले आहेत.

Web Title: 'This' will be the name of Shah Rukh, Anushka and Katrina's forthcoming film!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.