कायम स्मरणात राहील 'साधना कट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:40 IST2016-01-16T01:08:14+5:302016-02-05T14:40:56+5:30

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी-नैय्यर यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास ...

Will always remember 'sadhana cut' | कायम स्मरणात राहील 'साधना कट'

कायम स्मरणात राहील 'साधना कट'

लिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री साधना शिवदासानी-नैय्यर यांचे शुक्रवारी निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

साधना या 60-70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी जवळपास 35 हिट चित्रपटांमध्ये काम केले. यात 'वो कौन थी', 'मेरा साया', 'गीता मेरा नाम', 'दिल दौलत दुनिया', 'दुल्हा दुल्हन', 'हम दोनो' या चित्रपटांचा समावेश आहे. 'गीता मेरा नाम' या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते.

साधना आपल्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या खास हेअर स्टाईलसाठीही प्रसिद्ध होत्या. 'लव इन शिमला' या चित्रपटाचे दिग्दर्शक आर.के. नैय्यर यांनी साधनाच्या केसांना खास लूक दिला. या खास केश रचनेला 'साधना कट' असे नाव मिळाले. आपल्या केशरचनेमुळे देखील नंतरच्या पिढीला त्या आठवणीत राहिल्या.

मुलींमध्ये 'साधना कट' या हेअर स्टाईलची प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. त्यांच्या हेअरस्टाईलची कॉपी करण्याचा अनेक अभिनेत्रींनी प्रयत्न केला. साधना यांचे कपाळ मोठे असल्याने ते झाकण्यासाठी त्यांनी आपल्या केसांची विशेष रचना केली होती. मात्र त्यांचे ही स्टाईल लोकप्रिय झाली.

Web Title: Will always remember 'sadhana cut'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.