सुशांत सिंग राजपूतने नाकारलेला चित्रपट अभिषेक बच्चन स्वीकारणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:26 IST2017-10-12T11:58:06+5:302018-04-03T14:26:32+5:30

काही दिवसांपूर्वी सुशांतसिंग राजपूत ने सोशल मीडियावर आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती ज्याचे नाव रॉ म्हणजेच रोमिओ अकबर ...

Will Abhishek Bachchan accept Sushant Singh Rajput's nomination? | सुशांत सिंग राजपूतने नाकारलेला चित्रपट अभिषेक बच्चन स्वीकारणार का ?

सुशांत सिंग राजपूतने नाकारलेला चित्रपट अभिषेक बच्चन स्वीकारणार का ?

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">काही दिवसांपूर्वी सुशांतसिंग राजपूत ने सोशल मीडियावर आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती ज्याचे नाव रॉ म्हणजेच रोमिओ अकबर वॉल्टर असे होते, या चित्रपटाच्या घोषणेनंतर त्याने चित्रपटाचे पोस्टर सुद्धा रिलीज केले ज्याला पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली पण पोस्टर रिलीजच्या काही दिवसानंतर अशी बातमी आली की सुशांतसिंग राजपुतने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मागचे कारण असे सांगितले जाते की सुशांत सिंगकडे सध्या भरपूर चित्रपट आहेत. ज्यामुळे तो रॉ ह्या चित्रपटाला पूर्ण वेळ देऊ शकत नाही आहे.
आता अशी माहिती मिळते आहे की  रॉ च्या मेकर्सने सुशांतसिंगच्या जागी अभिषेक बच्चनला घेण्याच्या तयारीला लागले आहेत. ' डेक्कन क्रोनिकल' च्या बातमी नुसार आता अभिषेक बच्चन चित्रपट रॉ मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे त्यामुळे मेकर्सचे असे म्हणणे आहे की अभिषेक बच्चन ह्या भूमिकेसाठी योग्य आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ह्या चित्रपटाची निर्माती बंटी वालियाची पत्नी वेनेसा वालिया करते आहे. बंटी वालिया आणि अभिषेक बच्चन एकमेकांना  आधीपासून ओळखतात जेव्हा बंटीने अभिषेकला स्क्रिप्ट ऐकवून दाखवली त्यावेळी अभिषेकने लगेच ह्या चित्रपटासाठी होकार दिला.

रॉ हा चित्रपट भरपूर अॅक्शनने भरलेला आहे. त्यामुळे अभिषेक बच्चन या भूमिकेसाठी भरपूर वर्कआऊट  करतोय. एेवढे मात्र नक्की की अभिषेक बच्चनचा एक वेगळा अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे जो आजपर्यंत कधीच पाहिला नाही आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की  'बॉर्डर’सारखा सुपरडुपर हिट सिनेमा बनवणारे दिग्दर्शक जेपी दत्ता यांना अभिषेक बच्चन याने ऐनवेळी अडचणीत आणले आहे. होय, ज्युनिअर बच्चने का कुणास ठाऊक जे. पी. दत्ता यांच्या ‘पलटन‘ या मोस्ट अवेटेड चित्रपटाला नकार कळवला आहे.  ‘पलटन’चा फर्स्ट लूक जारी झाला असताना, शिवाय चित्रपटाची संपूर्ण युनिट लडाखमध्ये पोहोचली असताना अभिषेकने या चित्रपटाला नकार कळवणे, सगळ्यांसाठीच धक्कादायक होते.. 

Web Title: Will Abhishek Bachchan accept Sushant Singh Rajput's nomination?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.