घरचे जेवण सोडून श्रद्धाने का लावला दीड लाख रुपए महिन्याचा टिफिन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 15:14 IST2016-12-07T15:14:50+5:302016-12-07T15:14:50+5:30
‘रॉक आॅन2’नंतर श्रद्धा कपूर सध्या कशात बिझी असेल तर ते फिटनेसची चिंता करण्यात. होय, श्रद्धा अचानक फिटनेसबाबत प्रचंड सजग ...

घरचे जेवण सोडून श्रद्धाने का लावला दीड लाख रुपए महिन्याचा टिफिन?
‘ ॉक आॅन2’नंतर श्रद्धा कपूर सध्या कशात बिझी असेल तर ते फिटनेसची चिंता करण्यात. होय, श्रद्धा अचानक फिटनेसबाबत प्रचंड सजग झालेली दिसतेय. तिला तिचे वजन आणखी कमी करायचेयं आणि यासाठी घरचे जेवण सोडून श्रद्धाने दीड लाख महिन्याचा टिफिन लावला आहे. आता दीड लाख महिन्याचा टिफिन म्हणजे त्यात नक्कीच काही वेगळे असणार? नक्कीच!! श्रद्धाचा हा टिफिन साधासुधा नाही तर यात सहा प्रकारचे मिल्स आहेत.
श्रद्धाचे वडील शक्ती कपूर पंजाबी आहेत आणि आई शिवांगी कोल्हापुरे मराठी आहेत. त्यामुळे श्रद्धाच्या घरी पंजाबी आणि मराठी अशा दोन्ही प्रकारची पक्वाने बनतात. पण श्रद्धाने मराठी व पंजाबी या दोन्ही प्रकारचे जेवण बंद करून नवा टिफिन लावला आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स, नट्स,बीन्स आणि सलादचा समावेश आहे. श्रद्धाला हे नवे जेवन आवडू लागल्याचेही कळतेय.
अधिक स्लिम दिसण्यासाठी दीड लाख रुपए महिन्याचा टिफिन लावण्यासोबतच श्रद्धाने एक सेलिब्रिटी ट्रेनर आणि न्युट्रिशियनही हायर केला आहे. आता इतक्या प्रयत्नानंतर श्रद्धा आपले वजन किती कमी करते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरतेयं.
श्रद्धा कपूर गेल्या वर्षभरापासून चांगलीच चर्चेत आहे. फरहान अख्तरसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा मध्यंतरी चांगल्याच गाजल्या. नुकतीच श्रद्धा ‘रॉक आॅन2’मध्ये दिसली. आता ती ‘ओके जानू’,‘हाफ गर्लफ्रेन्ड’ आणि ‘हसीना’ या चित्रपटात बिझी आहे. २०१३ मध्ये ‘आशिकी2’ या चित्रपटाने श्रद्धा नावारूपास आली. यानंतर ‘हैदर’,‘एक विलेन’ आणि ‘एबीसीडी2’ सारख्या हिट चित्रपटांमध्ये ती दिसली.