​राजकुमार राव सध्या का आहे नाराज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 11:27 IST2017-05-28T05:57:43+5:302017-05-28T11:27:43+5:30

राजकुमार राव याचा आगामी चित्रपट ‘बहन होगी तेरी’ सध्या बराच चर्चेत आहे. सर्वप्रथम या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने ...

Why is Rajkumar Rao angry now? | ​राजकुमार राव सध्या का आहे नाराज?

​राजकुमार राव सध्या का आहे नाराज?

जकुमार राव याचा आगामी चित्रपट ‘बहन होगी तेरी’ सध्या बराच चर्चेत आहे. सर्वप्रथम या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने हा चित्रपट चर्चेत आला. यानंतर धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली या चित्रपटाचा दिग्दर्शक व निर्मात्यास अटक झाल्याची बातमी आली. तूर्तास या चित्रपटासंदर्भात आणखी एक बातमी आहे. होय, रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याने राजकुमार राव कमालीचा नाराज असल्याचे कळलेय.



होय, ‘बहन होगी तेरी’ आधी २ जूनला रिलीज होणार होता. यानंतर ही तारीख ९ जून करण्यात आली. आता ९ जून म्हटल्यावर बॉक्सआॅफिस संघर्ष अटळ. कारण नेमक्या याच दिवशी सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सॅनन यांचा ‘राबता’ हा सिनेमाही रिलीज होतो आहे. राजकुमारच्या नाराजीचे हेच कारण आहे. या बॉक्सआॅफिस क्लॅशमुळे राजकुमार नाराज आहे. या नाराजीचे सगळ्यात मोठे कारण काय, तर ‘राबता’मध्येही राजकुमार राव आहे. यात राजकुमार रावचा गेस्ट अपियरेन्स आहे. एका आगळ्यावेगळ्या अवतारात तो ‘राबता’मध्ये दिसणार आहे. त्याच्या या लूकची बरीच चर्चा होत आहे. पण खरे सांगायचे तर तूर्तास राजकुमार रावसाठी ‘राबता’पेक्षा त्याचा ‘सोलो हिरो’ चित्रपट ‘बहन होगी तेरी’ अधिक महत्त्वाचा आहे. या चित्रपटाची अधिक चर्चा व्हावी, असेच कुणालाही वाटेल. आमच्या कानावर तर आणखीही बरेच काही आले आहे.



होय, ‘राबता’मधील स्वत:चा लूक मेकर्सनी रिलीजपर्यंत सीक्रेट ठेवावा, असे राजकुमारचे म्हणणे होते. पण रिलीजपूर्वीच राजकुमारचा ‘राबता’ लूक समोर आला. ही गोष्ट राजकुमारला चांगलीच खटकलीयं म्हणे.

‘राबता’ या आगामी चित्रपटात राजकुमार राव याने तब्बल ३२४ वर्षांच्या म्हाता-या व्यक्तिची भूमिका साकारली आहे. हा परफेक्ट लूक मिळवण्यासाठी राजकुमार रावला मेकअपसाठी दरदिवशी पाच ते सहा तास लागायचे. खूप सारी ज्वेलरी आणि त्यासोबत अनेक टॅटू त्याला लावावे लागायचे. ही भूमिका जिवंत करण्यासाठी राजकुमारने त्याचे बॉडी पॉस्चर आणि आवाज यावर प्रचंड कष्ट घेतले. राजकुमारच्या या भूमिकेबद्दल नेमकी माहिती नाही. पण राजकुमार रावला या भूमिकेत पाहणे निश्चितच इंटरेस्टिंग असणार आहे. 

Web Title: Why is Rajkumar Rao angry now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.