​सोशल मीडियापासून का दूर पळते कंगना राणौत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2018 10:08 IST2018-04-15T04:38:50+5:302018-04-15T10:08:50+5:30

सध्या सोशल मीडियाचा ट्रेंड आहे. साहजिकचं बॉलिवूडचे बहुतांश सर्वचं लहान-मोठे कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियाची मदत घेतात. पण ...

Why is Kangana Ranaut running away from social media? | ​सोशल मीडियापासून का दूर पळते कंगना राणौत?

​सोशल मीडियापासून का दूर पळते कंगना राणौत?

्या सोशल मीडियाचा ट्रेंड आहे. साहजिकचं बॉलिवूडचे बहुतांश सर्वचं लहान-मोठे कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियाची मदत घेतात. पण बॉलिवूडची एक अभिनेत्री मात्र सोशल मीडियापासून कायम दूर पळते. होय, आम्ही बोलतोय ते बोल्ड व बिनधास्त कंगना राणौत हिच्याबद्दल. कंगना सोशल मीडियावर का नाही, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीचं पडतो. तर आता कंगनाने स्वत:चं याचे उत्तर दिले आहे.
कंगनाच्या मते, यात प्रचंड वेळ जातो. कंगना याबद्दल सांगते, अनेक लोक मला सोशल अकाऊंट उघडण्याचा सल्ला देतात. माझे एजेंट्सही मला हेच सुचवतात. तू कुठलीही पोस्ट करू नको, तुझ्यावतीने आम्ही तुझे सोशल अकाऊंट हाताळू, असा सल्लाही मला ते देतात. पण मला हे अजिबात पटत नाही. माझा स्वत:चा सहभाग नसताना माझ्या नावाने दुसºयाला माझ्या अकाऊंटवर पोस्ट करण्याची परवानगी मी का म्हणून देऊ? ही माझ्या चाहत्यांची फसवणूक ठरेल आणि माझ्या चाहत्यांची कुठल्याही प्रकारची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फसवणूक मला करायची नाहीय. असे करून मी लाखो लोकांची नक्कल करेल. माझ्या मते, अशी नाती नकली, बनावटी असतात. मला माझ्या चाहत्यांसोबत असे नाते मुळीच नकोय. मी सच्ची आहे आणि सच्चीचं राहणे मला पसंत आहे, असे कंगना म्हणाली.निश्चितपणे कंगनाचे हे विचार, अनुकरणीय आहे. कंगनाच्या सच्चेपणाची ग्वाही देणारे आहेत.
कंगनाला बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हटले जाते. कंगना आपल्या भूमिकेत अक्षरश: जीव ओतते. अर्थात असे असूनही कंगनाचे याआधीचे दोन चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार चांगली कामगिरी करू शकले नाहीत. सैफ अली व शाहिद कपूरसोबतचा तिचा ‘रंगून’ दणकून आपटला. यानंतरचा ‘सिमरन’ हा चित्रपटही प्रेक्षकांना प्रभावित करण्यास अपयशी ठरला. लवकरचं कंगना ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात दिसणार आहे. या पाठोपाठ ‘मेंटल है क्या’ हा तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ALSO READ : कंगना राणौत आयटम नंबर्स का करत नाही?

Web Title: Why is Kangana Ranaut running away from social media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.