Exculsive हितेनला का करायची आहे निगटिव्ह भूमिका ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2016 18:46 IST2016-11-09T18:46:15+5:302016-11-09T18:46:15+5:30

          बेनझीर जमादार           कुटुंब, क्योंकि सास कभी बहू थी या मालिकेतून ...

Why is Exculsive Hiten's negative role? | Exculsive हितेनला का करायची आहे निगटिव्ह भूमिका ?

Exculsive हितेनला का करायची आहे निगटिव्ह भूमिका ?

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">          बेनझीर जमादार
        
 कुटुंब, क्योंकि सास कभी बहू थी या मालिकेतून हितेन तेजवानी याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. विशेष म्हणजे कुटूंब या मालिकेतील त्याची आणि गौरी प्रधानची जोडीदेखील हिट झाली होती. आता हितेन सांसे या त्याच्या आगामी चित्रपटातून पुन्हा एका मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या या चित्रपटाच्या विषयी त्याने सीएनएक्सशी साधलेल्या हा खास संवाद. 
 
1. तू नेहमीच सोज्वळ भूमिकेत पाहायला मिळाला, आता तू थेट हॉरर चित्रपटात दिसणार आहेस याविषयी काय सांगशील?
 - एका कलाकाराला नेहमीच वेगवेगळया भूमिकेत दिसणे एका कलाकारासाठी गरजेचे असते. मी देखील फक्त एक सोज्वळ मुलगा कधीपर्यंत बनून राहू. माझी ही इमेज मला चेंज करायची आहे मलादेखील आयुष्यात पुढे जायचे आहे. त्यामुळे मला अशा विविध भूमिका साकारणे आवश्यक आहे. मला ही प्रेक्षकांना दाखवायचे आहे की, मी देखील समजूतदार, सोज्वळ भूमिकें व्यतिरिक्त  वेगवेगळ्या भूमिका साकारु शकतो. 
 
2. पूर्वीच्या आणि आताच्या मालिकांमध्ये काय फरक जाणवतो का?
- काळानुरूप मालिकांचे विषय हे बदलत चालले आहे. पूर्वी सांस-बहुच्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होत्या. त्यानंतर रियालिटी शोचा काळ आला. आता पाहिले तर प्रेक्षकांना वास्तववादी विषय जास्त पाहायला आवडतात. थोडक्यात सध्या जे समाजात घडते तेच मालिकांमध्य दाखविले जाते. तसेच पूर्वी आठ ते नऊ वर्षे एक मालिका चालायची. आताच्या मालिका या एक ते दोन वर्षातच बंद होतात.   
 
3. छोटया पडद्यावरील अनुभवाचा फायदा चित्रपटांसाठी होतो का?
- हो नक्कीच होतो. कारण छोटया पडद्यावरील अनुभवामुळे चित्रपटातील भूमिका करण्यास अधिक सोपे जाते. छोट्या पडद्यावरील अनुभवाचा फायदा चित्रपटातील भूमिकेसाठी होतो. मोठ्या पडद्यावर आपला अभिनय अधिक खुलण्यास मदत होते. माझ्या मते, मोठया पडदयावर काम करणे अधिक चांगल आहे. नवनवीन गोष्टी शिकण्यास मिळतात. मात्र मेहनत तशी दोन्हींकडे समान असते. 


4. हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान प्रेक्षकांना पडदयावर पुन्हा कधी पाहायला मिळणार?
- खरचं आम्हीदेखील प्रेक्षकांसमोर येण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आमच्या दोघांना ही कुटुंब या मालिकेसारखा एखादा चांगला विषय मिळाला तर आम्ही नक्कीच करू. तसेच गौरी जरी सध्या मुलांच्या संगोपनामध्ये व्यग्र असली तरी, ती देखील पुर्नगमनासाठी तयार आहे. पण फक्त ती एका चांगल्या कथेच्या प्रतिक्षेत आहे. 
 
 5. तू कोणत्या भूमिकेच्या प्रतिक्षेत आहे?
- खरं सांगू का, मला आता निगेटिव्ह भूमिका करायची उत्सुकता निर्माण झाली आहे. आतापर्यत खूप साऱ्या सकारात्मक भूमिका  केल्या आहेत. त्यामुळे मला प्रेक्षकांसमोर निगेटिव्ह भूमिकेत यायचे आहे. कोणी मला निगेटिव्ह भूमिकेसाठी विचारल तर मी नक्कीच करेन. 
 
6. मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सुक आहे का?
- मला मराठी चित्रपटांच्या ऑफर आल्यातर मी नक्कीच मराठी चित्रपट करेन. मराठीतील विषय हे कमालीचे असतात. तसेच मराठी चित्रपटांच्या कथेवर अभिनय करण्यासदेखील खूप मजा येते. तसेच सध्या मराठी चित्रपटांची चलती असल्याचे देखील दिसत आहे. 

Web Title: Why is Exculsive Hiten's negative role?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.