रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमध्ये का बदलतात दरवेळेस अभिनेत्री!?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 10:22 IST2017-10-17T04:52:49+5:302017-10-17T10:22:49+5:30

ह्या दिवाळीत मोठी धमाल होणार आहे कारण या दिवाळीत रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा गोलमाल अगेन रिलीज होणार आहे. ...

Why does Rohit Shetty's Golmaal series change in the actress every time !? | रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमध्ये का बदलतात दरवेळेस अभिनेत्री!?

रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमध्ये का बदलतात दरवेळेस अभिनेत्री!?

या दिवाळीत मोठी धमाल होणार आहे कारण या दिवाळीत रोहित शेट्टी दिग्दर्शित अजय देवगणचा गोलमाल अगेन रिलीज होणार आहे. रिलीजच्या आधीच हा चित्रपट हिट झाला आहे ह्यात शंकाच नाही. या मागचे कारण असे की प्रेक्षकांना गोलमालच्या पहिल्या तीन सीरिज फार आवडल्या होत्या आणि ते वाट बघत होते चौथ्या भागाची म्हणजेच गोलमाल अगेनची. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गोलमालच्या सर्व सीरिजमध्ये नेहमीच अजय देवगण, आर्शद वारसी, कुणाल खेमु, श्रेयस तळपदे, मुकेश तिवारी, जॉनी लिव्हर, संजय मिश्रा हे कलाकार असतात. पण महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक सीरिजमध्ये बदलते ती अभिनेत्री असे का बरे होते?

याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो नुकतेच अजय देवगणने त्याच्या मुलाखतीत म्हटलं की, जशी कथा बदलते  तसे कलाकार निवडले जातात या सीरिजमध्ये मुख्य भूमिका अभिनेत्रीची नाही आहे म्हणून प्रत्येक सीरीजमध्ये अभिनेत्री बदलतात. हे एक बरे झाले की कथा बदलल्यामुळे अभिनेत्री बदलतात आणि  चित्रपटात नवीन चेहरे पाहायला मिळतात.  नवीन कथेबरोबर नवीन चेहरे पाहायला मिळतात. 

त्यानंतर अजय देवगणला विचारले गेले की करिना कपूरने गोलमालच्या दोन सीरिजमध्ये चांगले काम केले होते मग गोलमाल अगेनमध्ये तिला का नाही घेतले गेले? त्यावर अजय देवगण म्हणाला "ह्या चित्रपटाच्या कथेला लक्षात घेता तब्बू आणि परिणीती चोप्रा या भूमिकेसाठी योग्य ठरल्या म्हणून त्यांना या चित्रपटात घेतले गेले. पुढच्या गोलमालच्या कथेला अनुसरून जर  करिना कपूर त्या भूमिकेसाठी फिट झाली तर ती नक्कीच या चित्रपटाचा हिस्सा पुन्हा बनेल" ह्यावरून असे कळते की लवकरच गोलमाल पाचवा चित्रपट सुद्धा तयार करण्यात येणार आहे.  या सिनेमाचा ट्रेलर २४ तासांपेक्षा कमी वेळात २० दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिला असल्याचा विक्रम या चित्रपटाने नोंदवला आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स तिकिट बुकिंगला एक महिन्यापूर्वीच सुरुवात करण्यात आली आहे.  एक महिन्यापूर्वीच होत असलेल्या तिकिट बुकिंगची ही पहिलीच वेळ असल्यामुळे भारतीय चित्रपट इतिहासात 'गोलमाल अगेन' चित्रपटाची नोंद करण्यात आली आहे.   

ALSO READ : गोलमाल अगेनमुळे नाही तर या कारणामुळे खास आहे अजय देवगणची दिवाळी

Web Title: Why does Rohit Shetty's Golmaal series change in the actress every time !?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.