धर्म हवाच कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:39 IST2016-01-16T01:12:29+5:302016-02-07T12:39:10+5:30

जगाच्या इतिहासात आतापर्यंत असंख्य लोक धर्माच्या नावाखाली मारल्या गेले आहेत. आपल्या भारतात तर धर्म हीच मोठी समस्या झाली आहे. ...

Why do you want religion? | धर्म हवाच कशाला?

धर्म हवाच कशाला?

ाच्या इतिहासात आतापर्यंत असंख्य लोक धर्माच्या नावाखाली मारल्या गेले आहेत. आपल्या भारतात तर धर्म हीच मोठी समस्या झाली आहे. धर्माशिवायदेखील माणूस सुखाने जगू शकेल. भारतात असे झाल्यास सर्व लोकांचे भले होईल, असे स्पष्ट मत ह्यपीकेचे फिल्ममेकर राजकुमार हिरानी यांनी व्यक्त केले.

मानवाने स्वत:च आपल्यासाठी समस्या निर्माण केल्याचे सांगून हिरानी म्हणाले, धर्म ही मानवनिर्मित कल्पना आहे. धर्माच्या नावाखाली माणसाने सर्वच गोष्टींची विभागणी केली. हिरवा रंग मुस्लिमांचा, भगवा हिंदूंचा.. गाय एकाची, तर बकरी दुसर्‍याची. धर्माच्या नावाखाली आपल्याकडे किती तरी लोक मारल्या गेले. तरीदेखील आपले डोळे उघडलेले नाहीत. अशा वृत्तीमुळे मानवाचे खूप नुकसान झाले. आता तरी आपण शहाणे व्हायला हवे. असे झाल्यास अनेक समस्या दूर होतील. ह्यपीकेमधून मी नेमके हेच सांगण्याचा प्रयत्न केला. आमिर खानने देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास मात्र हिरानी यांनी नकार दिला.

Web Title: Why do you want religion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.