कॅटला आत्ताच का खुणावतोयं छोटा पडदा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2016 17:47 IST2016-10-18T17:47:10+5:302016-10-18T17:47:10+5:30
कॅटरिना कैफची जादू ओसरलीय? हा प्रश्न तुम्हाला आम्हालाच नाही तर कदाचित खुद्द कॅटरिनालाही पडला असेल. म्हणून की काय, कॅटला ...

कॅटला आत्ताच का खुणावतोयं छोटा पडदा?
क टरिना कैफची जादू ओसरलीय? हा प्रश्न तुम्हाला आम्हालाच नाही तर कदाचित खुद्द कॅटरिनालाही पडला असेल. म्हणून की काय, कॅटला छोटा पडदा खुणावू लागला आहे. ‘फितूर’ आपटल्यानंतर ‘बार बार देखो’कडून कॅटला मोठी अपेक्षा होती. पण या दोन्ही चित्रपटांनी कॅट निराशा केली. या दोन्ही चित्रपटांच्या अपयशानंतर कॅटचा ‘जग्गा जासूस’ येणार आहे. पण तोही पुढील वर्षी एप्रिलमध्ये. सलमानसोबतच्या ‘एक था टायगर’च्या सीक्वलमध्ये कॅट दिसणार आहे. पण तोही नव्या वर्षांत सुरु होणार आहे. एकंदर काय तर कॅटकडे सध्या भरपूर मोकळा वेळ आहे. या मोकळ्या वेळात हाताला काम हवे.(शिवाय हातात पैसेही यायला हवे) यामुळे कॅटला कदाचित छोटा पडदा खुणावू लागला आहे. एका मुलाखतीत तिने याबाबतचे संकेत दिले. टीव्ही हे माध्यम आता छोटे राहिलेले नाही. मला नृत्याची आवड आहे आणि टीव्हीवर एखाद्या डान्स शोची आॅफर मिळाली, तर मी ती नक्की स्वीकारेल, अशी ती म्हणाली. आता हाताला काम नसल्यावर सगळेच काही छान-छान वाटते, हे सांगायला नकोच. तेव्हा कॅटरिनालाही छोटा पडदा छान-छान वाटू लागला आहे. कॅटरिनाच्या सोबतच्या अनेक अभिनेत्री छोट्या पडद्यावर वळल्या आहेत. शिवाय कॅटची सर्वात जवळची व्यक्ति अर्थात सलमान खानही बॉलिवूडशिवाय छोट्या पडद्यावर सक्रिय आहे. अशास्थितीत कॅटला छोट्या पडद्यावर काम करण्यात गैर वाटण्याचे तसे कारणही नाही. आता कॅटला लवकरच आॅफर मिळो अन् तिच्या हाताला काम मिळो, हीच आमची सदिच्छा!