प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने का बनवले मॅचिंग टॅटू?, अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 10:41 AM2021-02-05T10:41:43+5:302021-02-05T10:41:43+5:30

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस नेहमी चर्चेत येत असतात.

Why did Priyanka Chopra and Nick Jonas get matching tattoos ?, the actress revealed | प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने का बनवले मॅचिंग टॅटू?, अभिनेत्रीने केला खुलासा

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने का बनवले मॅचिंग टॅटू?, अभिनेत्रीने केला खुलासा

googlenewsNext

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत फेव्हरेट कपल्सपैकी एक आहेत. ते दोघे नेहमी चर्चेत येत असतात. ही जोडी मागील दोन वर्षांपासून एकत्र आहेत आणि आपल्या विवाहित जीवनात खूश आहेत. प्रियंका चोप्राचे लग्न निक जोनससोबत राजस्थानमधील जोधपूरमध्ये २०१८ साली झाले होते. निक आणि प्रियंकाची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे.

निक जोनस आणि प्रियंका चोप्राने दोन महिने एकमेकांना डेट केले होते. त्यानंतर दोघांनी जुलै २०१८ला साखरपुडा केला. साखरपुड्याच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला प्रियंका आणि निकने मॅचिंग टॅटू बनविला होता. हा टॅटू प्रियंकाच्या दोन्ही कानाच्या मागे टॅटू आहे. एका कानाच्या मागे बॉक्स बनावला आहे तर दुसऱ्या कानाच्या मागे टिकचे निशाणा बनवला आहे. हे सेम टॅटू निकने आपल्या दोन्ही हातांवर काढले आहे. आता प्रियंकाने यामागचे कारण सांगितले आहे.


एले मॅगझिनला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियंका चोप्राने तिच्या आणि निक जोनसच्या मॅचिंग टॅटूबद्दल सांगितले. तसेच टॅटूची झलकदेखील दाखवली. तिने या टॅटूमागच्या कॉन्सेप्टचा खुलासा करत सांगितले की, आमच्या एगेंजमेंटला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही मॅचिंग टॅटू बनवून तो दिवस साजरा केला होता.


माझा टॅटू माझ्या कानाच्या मागे आहे आणि त्यांचा टॅटू त्याच्या दोन्ही हातांवर आहे. आम्ही एका बाजूला चेक आणि दुसऱ्या बाजूला बॉक्स बनविला आहे.


प्रियंका चोप्रा आणि निक जोनसचे लग्न १, डिसेंबर, २०१८ साली जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये पार पडले होते. त्यांनी ख्रिश्चन आणि हिंदू रिती रिवाजात लग्न केले होते. यावेळी या दोघांच्या जवळचे मित्र आणि कुटुंबातील लोक उपस्थित होते.

Web Title: Why did Priyanka Chopra and Nick Jonas get matching tattoos ?, the actress revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.