लग्नानंतर दोन वर्षांनी प्रिती झिंटाने नावात का केला बदल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 15:18 IST2018-06-08T09:48:47+5:302018-06-08T15:18:47+5:30

अभिनेत्री प्रिती झिंटा अलीकडे बॉलिवूडमध्ये कमी अन् क्रिकेटच्या मैदानावर अधिक दिसते़. दोन वर्षांपर्वूी प्रितीने गुपचूप लग्न उरकले. पण म्हणून ...

Why did Preity Zinta change name after two years after marriage? | लग्नानंतर दोन वर्षांनी प्रिती झिंटाने नावात का केला बदल?

लग्नानंतर दोन वर्षांनी प्रिती झिंटाने नावात का केला बदल?

िनेत्री प्रिती झिंटा अलीकडे बॉलिवूडमध्ये कमी अन् क्रिकेटच्या मैदानावर अधिक दिसते़. दोन वर्षांपर्वूी प्रितीने गुपचूप लग्न उरकले. पण म्हणून बॉलिवूडमध्ये काम करायचे नाही, असे काही तिने ठरवले नव्हते. पण असे असूनही गत दोन वर्षांत बॉलिवूडमध्ये ती कुठेही दिसली नाही. चाहत्यांची यामुळे प्रचंड निराशा झाली. कदाचित प्रितीलाही हे प्रकर्षाने जाणवले. मग काय, काही तरी हातपाय हलवायला हवेतचं ना. कदाचित म्हणून प्रितीने लग्नाच्या दोन वर्षांनंतर आपले नाव बदलले़य. होय, तुम्ही वाचले ते अगदी खरे आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर प्रितीने आपल्या नावात बदल केला आहे. सोशल मीडियाचर तिने याबाबतची घोषणा केली. लग्नानंतर मी माझ्या पतीच्या नावातील ‘जी’ हे अक्षर माझ्या नावासोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे. एक ‘जी’ माझ्यासाठी ‘गुडइनफ’(गुडइनफ हे प्रितीचे सासरचे आडनाव आहे़) आहे, असे तिने लिहिले आहे. म्हणजे आता प्रिती ‘प्रिती जी झिंटा’ या नावाने ओळखली जाईल.



अनेकांच्या मते, लग्नाच्या दोन वर्षांनंतर प्रितीने नावात केलेला बदल हा अंकशास्त्राला धरून आहे. सध्या प्रितीचे ग्रह फारसे अनुकूल नाही, कदाचित म्हणूनचं भाग्य फळफळावे या हेतूने तिने हा बदल केला आहे. ‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुप्रसिद्ध न्युमरॉलॉजिस्ट संजय जुमानजी यांच्या सल्ल्यानुसार, प्रितीने आपल्या पतीच्या नावाचे आद्याक्षर आपल्या नावासोबत जोडले आहे.

ALSO READ : लिरिल गर्ल ते बॉलिवूड अभिनेत्री...असा आहे प्रिती झिंटाचा बॉलिवूड प्रवास!!

बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटींची अंकशास्त्रावर प्रगाढ श्रद्धा आहे. अभिनेता आयुष्यमान खुराणा याने एका मुलाखतीत याबाबत सांगितले होते. माझे पापा ज्योतिषी आहेत. त्यांच्या सांगण्यावरून मी माझ्या नावात बदल केला, असे त्याने सांगितले होते. या यादीत एकता कपूरचेही नाव आहे. एकताने दीर्घकाळ आपल्या मालिकांचे नाव ‘के’ या आद्याक्षरावरून ठेवले. प्रितीनेही असाचं काही सल्ला घेतला असेल आणि या सल्ल्यानुसार नावात बदल केला असेल तर याचा तिला किती लाभ होतो, ते बघणे इंटरेस्टिंग असणार आहे.
२०१६ मध्ये  प्रिती  यूएसमधील तिचा बॉयफ्रेंड जेने गुडइनफ यांच्यासोबत विवाह बंधनात अडकली होती.  लॉस एंजेलिसमध्ये हा लग्नसोहळा पार पाडला होता. तर मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी दिली होती.  

Web Title: Why did Preity Zinta change name after two years after marriage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.