​बॉलिवूडमधील ‘अ‍ॅक्शन’ला का कंटाळला अजय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:03 IST2016-10-15T17:03:24+5:302016-10-15T17:03:24+5:30

दिग्गज अ‍ॅक्शन दिग्दर्शक वीरू देवगण याचा मुलगा म्हणजे अभिनेता अजय देवगण. खरे तर आपल्या करिअरमध्ये अजयने अ‍ॅक्शन, रोमॅन्टिक, कॉमिक ...

Why bollywood Bollywood actress Ajay? | ​बॉलिवूडमधील ‘अ‍ॅक्शन’ला का कंटाळला अजय?

​बॉलिवूडमधील ‘अ‍ॅक्शन’ला का कंटाळला अजय?

ग्गज अ‍ॅक्शन दिग्दर्शक वीरू देवगण याचा मुलगा म्हणजे अभिनेता अजय देवगण. खरे तर आपल्या करिअरमध्ये अजयने अ‍ॅक्शन, रोमॅन्टिक, कॉमिक अशा सगळ्याच भूमिका केल्यात. पण अजयला ख-या अर्थाने ओळखले जाते ते अ‍ॅक्शन हिरो म्हणूनच. पण हाच अजय आता बॉलिवूडमधील अ‍ॅक्शनपटांना उबगला आहे. होय, खुद्द अजयनेच हा खुलासा केला. मी आत्तापर्यंत खूप अ‍ॅक्शन केले आणि त्या-त्यावेळी मी ते एन्जॉयही केले. पण आता मला त्याच त्या अ‍ॅक्शनचा कंटाळा आला आहे. मी वैतागलो आहे. त्यामुळेच ‘शिवाय’मध्ये मी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केलाय. ‘शिवाय’मध्ये अ‍ॅक्शनच्या बाबतीत नव-नवे प्रयोग करणे कठीण होते. पण वेगळे काही करण्याचा आनंद काही औरच असतो, असे अजय म्हणाला. आता अजयचा हा खुलासा ‘प्रमोशन फंडा’ न ठरो, म्हणजे मिळवले!!

Web Title: Why bollywood Bollywood actress Ajay?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.