हॉलिवूडसाठी काम करण्यात का नाही आमिर खानला रस? जाणून घेण्यासाठी वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 18:39 IST2017-01-19T18:35:57+5:302017-01-19T18:39:02+5:30

‘बी टाऊन’ मध्ये सध्या एक ट्रेंड जाम जोरात सुरूय.. कुठला? होय, हॉलिवूड चित्रपटांसाठी काम करण्याचा. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका ...

Why is Aamir Khan interested in working for Hollywood? Read to learn ... | हॉलिवूडसाठी काम करण्यात का नाही आमिर खानला रस? जाणून घेण्यासाठी वाचा...

हॉलिवूडसाठी काम करण्यात का नाही आमिर खानला रस? जाणून घेण्यासाठी वाचा...

ी टाऊन’ मध्ये सध्या एक ट्रेंड जाम जोरात सुरूय.. कुठला? होय, हॉलिवूड चित्रपटांसाठी काम करण्याचा. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, इरफान खान आणि बऱ्याच जणांना सध्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची भूरळ पडलीय. पण, तुम्हाला माहितीये का? एक अभिनेता आहे ज्याला हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करण्याबद्दल बिल्कुल रस नाही. तो म्हणजे बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान. 

एका मुलाखतीदरम्यान आमिर खानला विचारण्यात आले की,‘ तू हॉलिवूड चित्रपटात काम करण्यास उत्सुक आहेस का? त्यावर तो उत्तरला,‘मला यूएसला जाऊन तिथे हॉलिवूडपटांसाठी काम करणं पहिल्यापासूनच आवडत नाही. भारतीय चित्रपटांसाठी काम करायलाच मला तुफान आवडतं. २५-२६ वर्षांपासून येथील चाहत्यांसोबत माझी बाँण्डिंग आहे. माझ्यासाठी सर्वांत जास्त तेच महत्त्वाचं आहे. पण, जागतिक प्रेक्षकवर्गाचे मनोरंजन करणं ही बाब चुकीची आहे असं नव्हे तर जर मला एखादा इंटरेस्टिंग प्रोजेक्ट मिळालाच तर नक्कीच मला तो करायला आवडेलही. जर मला जपानहून आॅफर मिळाली तर मी नक्कीच विचार करीन. ’ 

‘जंगल बुक ’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर उत्तम कमाई केली. मग त्यामुळे भारतीय चित्रपटांना काही त्रास झाला का? असा प्रश्न आमिरने एका मुलाखतीत स्वत:च केला आणि त्याचे उत्तरही स्वत:च दिले की,‘आपण आपल्या चित्रपटाचा दर्जा घसरवतो. आपण जर पूर्ण मेहनत घेऊन अभिनय साकारला तर नक्कीच तो प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचतोच. बाहेरचे कोणी कलाकार येऊन कधीही भारतीय चित्रपटांचा बिझनेस घेऊ शकत नाहीत.’ 

Also Read:
ॠषी कपूरच्या मते; आमिर खान नव्या जमान्याचा ‘राज कपूर’
एकदा वाचाच! बेंगळुरातील विनयभंगाच्या घटनेवर काय म्हणाले, आमिर, अक्षय...!!

Web Title: Why is Aamir Khan interested in working for Hollywood? Read to learn ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.