कोणाचा वाढदिवस सेलिब्रेट करीत असाव्यात कॅटरिना कैफ आणि जान्हवी कपूर?, व्हिडीओ होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 15:14 IST2018-06-08T09:44:07+5:302018-06-08T15:14:18+5:30

सध्या अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये या दोघी कोणाचा तरी वाढदिवस सेलिब्रेट करीत आहेत. जाणून घ्या!

Whose birthday celebrate Katrina Kaif and Janhavi Kapoor ?, the video is viral! | कोणाचा वाढदिवस सेलिब्रेट करीत असाव्यात कॅटरिना कैफ आणि जान्हवी कपूर?, व्हिडीओ होतोय व्हायरल!

कोणाचा वाढदिवस सेलिब्रेट करीत असाव्यात कॅटरिना कैफ आणि जान्हवी कपूर?, व्हिडीओ होतोय व्हायरल!

लिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी जान्हवी कपूर पहिल्यांदा सोशल मीडियावर एकत्र बघावयास मिळाले. मुंबई येथील प्रसिद्ध फिटनेस इंस्ट्रक्टर यास्मिन कराचीवाला हिंच्या जीममध्ये दोघीही एक्सरसाइज करण्यासाठी येत असतात. जिममधील अन्य एक्सरसाइज इन्स्ट्रक्टन निशरीन पुनावाला हिच्या बर्थडेमध्ये या दोन्ही स्टार सहभागी झाल्या होत्या. स्वत: कॅट आणि जान्हवीने निशरीनला तिच्या वाढदिवसाचा केक भरविला. निशरीनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की, कॅट आणि यास्मिन जान्हवीला बर्थडे केक आॅफर करताना दिसत आहेत. 
 

नेहमीच आपल्या फिटनेसवर लक्ष ठेवून राहणाºया कॅटने गुरुवारी जिम स्टाफ आणि जान्हवीसोबत बराच वेळ व्यतित केला. निशरीन पुनावालाने जान्हवी आणि कॅट दोघीनाही बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो टॅग केले. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘थॅँक्यू यास्मिन कराचीवाला आणि माझे सर्व सहकारी, ज्यांनी माझा वाढदिवस खास बनविला. दरम्यान, कॅट आणि जान्हवी गेल्या एक महिन्यांपासून  जिममध्ये एक्सरसाइजला जात आहे. काही दिवसांपूर्वीच कॅटने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जान्हवीचा फोटो पोस्ट करताना लिहिले होते की, जिममध्ये एक नवी रिसेप्शनिस्ट ज्वॉइन झाली आहे. फोटोमध्ये जान्हवी फोन कॉल रिसिव्ह करताना दिसत होती. 
 

निशरीनने तिच्या इन्स्टाग्रामवर जान्हवीसोबतचा एक फोटोही शेअर केला. ज्यामध्ये जान्हवी तिच्या पाठीवर बसलेली दिसत आहे. जान्हवी सध्या तिच्या डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘धडक’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असून, लवकरच तिचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर बघावयास मिळणार आहे. 
 

Web Title: Whose birthday celebrate Katrina Kaif and Janhavi Kapoor ?, the video is viral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.