​अख्खे बॉलिवूड ‘पद्मावती’च्या बाजूने, पण कंगना राणौतने घेतला वेगळाच निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 15:08 IST2017-12-03T09:38:48+5:302017-12-03T15:08:48+5:30

‘पद्मावती’ या चित्रपटाचा चा वाद सध्या गाजतोय. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावती’त ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याच्या दावा करीत, ...

The whole Bollywood film 'Padmavati', but Kangana Ranaut took a different decision! | ​अख्खे बॉलिवूड ‘पद्मावती’च्या बाजूने, पण कंगना राणौतने घेतला वेगळाच निर्णय!

​अख्खे बॉलिवूड ‘पद्मावती’च्या बाजूने, पण कंगना राणौतने घेतला वेगळाच निर्णय!

द्मावती’ या चित्रपटाचा चा वाद सध्या गाजतोय. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावती’त ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याच्या दावा करीत, काही राजकीय पक्ष, राजपूत संघटना व नेत्यांनी या चित्रपटाला विरोध चालवला आहे. केवळ विरोधच नाही तर भन्साळींसह या चित्रपटात लीड रोलमध्ये असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. अर्थात या धमक्यानंतर संपूर्ण बॉलिवूड दीपिकाच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. अनेकांनी ‘पद्मावती’ व दीपिकाला पाठींबा दिला आहे. पण आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणौत हिने मात्र दीपिकाला साथ देण्यास नकार दिला आहे.

अलीकडे दीपिकाची सुरक्षा लक्षात घेता, बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘दीपिका बचाओ’ कॅम्पेन सुरु केले.  याअंतर्गत बॉलिवूडने दीपिकाच्या सुरक्षेची मागणी करत, स्वाक्षरी मोहिम उघडली आहे. यावर हेमा मालिनी, करिना कपूर, जया बच्चन, आलिया भट्ट, विद्या बालन यासह अनेक अभिनेत्रींनी स्वाक्षरी केली आहे. स्वाक्षरीचे हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहे. पण जेव्हा शबाना आझमींचे हे निवेदन सर्वांप्रमाणेच स्वाक्षरीसाठी कंगनाकडे गेले, तेव्हा म्हणे तिने यावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. अर्थात साईन न करण्यामागचे कारण मात्र तिने दिले नाही. आता कंगनाचा यामागचा इरादा काय ते आम्हाला ठाऊक नाही. पण कदाचित पडत्या काळात कुणीच आपल्या मदतीला आले नाही,याचा राग कंगनाच्या मनातून गेलेला नाही. ऋतिक आणि आदित्य पांचोली प्रकरणात कंगनाने अनेकांना सपोर्ट मागितला होता. पण त्यावेळी कुणीच तिला सपोर्ट केला नाही. कदाचित म्हणूनच आता कंगनालाही कुणाचाच सपोर्ट करायचा नाही. असो शेवटी कुणाला सपोर्ट करायला आणि कुणाला नाही, हा शेवटी कंगनाचा निर्णय आहे. आपण त्यात काय बोलणार?

ALSO READ : कंगना राणौतसाठी लिहिली जातेय, खास कथा! वाचा संपूर्ण बातमी!!

कंगना राणौत तूर्तास  ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये  बिझी आहे.  कदाचित कुठल्याही वादापेक्षा तिने स्वत:ला कामात बिझी करून घेतले आहे. अलीकडे या चित्रपटाच्या सेटवरचे राणी लक्ष्मीबाईच्या पेहरावातील कंगनाचे काही फोटो लीक झाले होते. 

Web Title: The whole Bollywood film 'Padmavati', but Kangana Ranaut took a different decision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.