कोणाला वाटायचे सलमान खानने बनावे क्रिकेटर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 16:38 IST2017-01-31T11:08:18+5:302017-01-31T16:38:51+5:30

सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांची एक सुप्त इच्छा होती जी अपूर्णच राहिली. आता सलमानसारखा सुपरस्टार ...

Whoever wants to make the cricketer Salman Khan? | कोणाला वाटायचे सलमान खानने बनावे क्रिकेटर?

कोणाला वाटायचे सलमान खानने बनावे क्रिकेटर?

मान खानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांची एक सुप्त इच्छा होती जी अपूर्णच राहिली. आता सलमानसारखा सुपरस्टार मुलगा असताना त्यांची कोणती इच्छा पूर्ण झालेली नाही, असे वाटणे स्वभाविक आहे. आपल्या तीन मुलांपैकी - सलमान, अरबाज खान आणि सोहेल खान - एकाने तरी देशासाठी क्रिकेट खेळावे, असे त्यांना मनोमन वाटायचे.

नुकतेच एका कार्यक्रमात अभिनेता-दिग्दर्शक सोहेल खानने हा खुलासा केला. तो म्हणाला की, ‘माझ्या वडिलांची मनापासून इच्छा होती की आम्हा तिन्ही भावंडांपैकी कोणीतरी क्रिकेटर व्हावे. त्यासाठी ते आम्हाला प्रॅक्टिसलादेखील घेऊन जायचे. पण आमच्यापैकी कोणीच त्या लेव्हलचे क्रि केट खेळू शकत नसल्यामुळे त्यांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले.’

ALSO READ: सोहेल खानसोबत लिंकअपच्या बातम्यांवर अशी काही बोलली हुमा कुरेशी!

सलमान खाननेसुद्धा याआधी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘वडिलांना मी क्रिकेटर व्हावे अशी फार इच्छा होती. मला बऱ्यापैकी खेळायचो पण ज्या दिवशी वडिल माझा खेळ पाहायला आले त्या दिवशी मी मुद्दामहून वाईट खेळलो. कारण मला क्रिकेटर होण्यात काहीच रस नव्हता.’

सोहेलनेदेखील मान्य केले की, तो काही फार चांगला क्रिकेटर नाही. तो म्हणाला, ‘टाईपपास म्हणून मला खेळता येते. खेळाविषयी प्रेमदेखील खूप आहे. पण वडिलांची इच्छा जरा अवास्तवच होती.’ आता सलमानने गेल्या वर्षी ‘सुल्तान’मध्ये कुस्तीपटूची भूमिका करून चंदेरी पडद्यावर का होईना पण देशासाठी गोल्ड मेडल जिंकून दिले. त्याचप्रमाणे आगामी एखाद्या चित्रपटात क्रिकेट खेळाडूची भूमिका करून त्याने वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्यास काही हरकत नसावी.

ALSO READ: सलमान खानने कुटुंबियांसह ड्रायव्हरच्या मुलाच्या वेडिंग रिसेप्शनला या अंदाजात लावली हजेरी

एखाद्या क्रिकेटरच्या जीवनावर चित्रपट बनवायला किं वा त्या अभिनय करायला आवडले का? या प्रश्नावर सोहेल म्हणतो, ‘प्रत्येक काळात एखादा असामान्य खेळाडू असतो ज्याची जीवन कहाणी चंदेरी पडद्यावर रंगवण्यासाठी अगदी योग्य असते. ब्रॅडमन, गावसकर, तेंडुलकर आणि आता विराट कोहली. अभिनय तर नाही पण निर्मिती करायला जरूर आवडेल.’

Web Title: Whoever wants to make the cricketer Salman Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.