रिसेप्शनच्या दिवशी अनुष्काच्या कडेवर झोपलेला हा चिमुकला कोण असेल बरं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 21:05 IST2017-12-22T15:35:03+5:302017-12-22T21:05:03+5:30

दिल्ली येथे नुकतेच विरूष्काच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनमधील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये अनुष्काचा एका चिमुकल्यासोबतचा फोटो चांगलाच पसंत केला जात आहे.

Who will be the snail on the side of Anuska on the reception day? | रिसेप्शनच्या दिवशी अनुष्काच्या कडेवर झोपलेला हा चिमुकला कोण असेल बरं?

रिसेप्शनच्या दिवशी अनुष्काच्या कडेवर झोपलेला हा चिमुकला कोण असेल बरं?

रतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी दिल्ली येथे त्यांच्या लग्नाचे अतिशय ग्रॅण्ड असे रिसेप्शन दिले. दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. या सोहळ्यात विराटचे नातेवाईक तथा मित्रपरिवार सहभागी झाला होता. त्याचबरोबर त्याचा सहकारी शिखर धवनही परिवारासोबत उपस्थित होता. या दोघांनी मिळून सोहळ्यात खूप धमाल केली. दोघांचे डान्स करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर अनुष्काच्या कडेवर असलेल्या एका चिमुकल्याचाही फोटो समोर येत असून, हा चिमुकला कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

फोटोमध्ये अनुष्का स्माइल देताना दिसत असून, तो चिमुकला तिच्या कडेवर झोपलेला असल्याचे दिसत आहे. हा चिमुकला शिखर धवनचा मुलगा जोरावर असून, त्याला अनुष्काची कंपनी चांगलीच आवडल्याचे दिसून येत आहे. दोघांचा हा फोटो खूपच गोंडस असून, सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, तर दुसºया एका व्हिडीओमध्ये विराट जोरावर कडेवर घेऊन भांगडा करताना दिसत आहे. ११ डिसेंबर रोजी लग्नाच्या बंधनात अडकलेल्या या दाम्पत्याने दिल्ली येथे शाही रिसेप्शन दिले. त्याचबरोबर येत्या २६ डिसेंबरला मुंबई येथेही रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. 
 

दरम्यान, रिसेप्शन सोहळा संपल्यानंतर विरुष्काने हे फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले. सध्या हे दाम्पत्य मुंबई येथे पोहोचले असून, तेथील रिसेप्शनच्या तयारीला लागले आहेत. २६ डिसेंबर रोजी मुंबई येथे या दाम्पत्याच्या रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

Web Title: Who will be the snail on the side of Anuska on the reception day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.