​जाणून घ्या कोण आहे सलमान खानची नवी जोडीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 11:38 IST2017-09-14T06:08:33+5:302017-09-14T11:38:33+5:30

सलमानचा किक हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा सगळ्यांनाच भावली होती. या चित्रपटातील जॅकलिन फर्नांडिस आणि सलमान ...

Who is Salman Khan's new partner? | ​जाणून घ्या कोण आहे सलमान खानची नवी जोडीदार

​जाणून घ्या कोण आहे सलमान खानची नवी जोडीदार

मानचा किक हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा सगळ्यांनाच भावली होती. या चित्रपटातील जॅकलिन फर्नांडिस आणि सलमान खानच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा झाली होती. जुम्मे की रात है, हँगओव्हर ही गाणी तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. 
किक या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाची लोकप्रियता पाहाता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातदेखील सलमान खानच प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. केवळ या चित्रपटात सलमानची जोडी जॅकलिनसोबत नव्हे तर एका दुसऱ्याच अभिनेत्रीसोबत जमणार आहे. 
सलमानसोबत यंदा किक २ या चित्रपटात बॉलिवूडमधील आजची आघाडीची एक अभिनेत्री दिसणार आहे. सलमान आणि दीपिका पादुकोण हे दोघेही आज आघाडीचे कलाकार आहेत. पण त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. पण आता ते दोघे किक २ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. किक या चित्रपटाचा सिक्वल येणार अशी चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून २०१९ च्या ख्रिसमसमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

salman khan deepika padukone


सलमान आणि दीपिकाने एकत्र काम करावे अशी त्यांच्या फॅन्सची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. त्यांच्या फॅन्सचे ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. बॉलिवूड लाइफ या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार दीपिकाला किक २ या चित्रपटासाठी विचारण्यात आले असून पुढील वर्षांत या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. सलमान आणि जॅकलिनची जोडी प्रेक्षकांना रेस ३ या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने किक २ या चित्रपटासाठी एका नव्या जोडीचा विचार करण्यात आला आहे. 
सलमान खान सध्या टायगर जिंदा है या चित्रपटाच्या चित्रकरणासाठी दुबईमध्ये आहे तर दीपिका तिच्या पद्मावती या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यामुळे या वर्षी नाही तर पुढच्या वर्षीं ते दोघे चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Also Read : सलमान खानचा हा फोटो का होत असेल व्हायरल? जाणून घ्या!

Web Title: Who is Salman Khan's new partner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.