जान्हवी कपूरच्या आयुष्यातील 'तो' मिस्ट्रीबॉय कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 18:09 IST2018-04-09T11:36:47+5:302018-04-09T18:09:22+5:30

जान्हवी कपूर सध्या आपल्या बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत आहे. जान्हवीचा धडक चित्रपट रिलीज होण्याआधीचे तिचे मोठे फॅन फॉलोईंग आहे. आईच्या निधनाच्या ...

Who is the 'Mysteryboy' in Janhavi Kapoor's life? | जान्हवी कपूरच्या आयुष्यातील 'तो' मिस्ट्रीबॉय कोण ?

जान्हवी कपूरच्या आयुष्यातील 'तो' मिस्ट्रीबॉय कोण ?

न्हवी कपूर सध्या आपल्या बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत आहे. जान्हवीचा धडक चित्रपट रिलीज होण्याआधीचे तिचे मोठे फॅन फॉलोईंग आहे. आईच्या निधनाच्या दु:खातून बाहेर येण्यासाठी जान्हवीला तिचा खास मित्र मदत करतो आहे. काही लोक जान्हवीचा या खास मित्र तिचा बॉयफ्रेंड असल्याचे बोलत आहेत. जान्हवी आणि तिच्या खास मित्राचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जान्हवीच्या बर्थ डे पार्टीसुद्धा हा खास मित्र दिसला होता. जान्हवीच्या या खास मित्राचे नाव अक्षत आहे. 6 मार्च 2018 ला झालेल्या जान्हवीच्या बर्थ डे सेलिब्रेशनच्या पार्टीमध्ये कुटुंबीयांसोबत तिचा मित्र अक्षतसुद्धा हजर होता. ऐवढेच नाही तर अक्षतने जान्हवीच्या बर्थ डे इन्स्टाग्रामवर विश करताना  हार्ट आइकॉन बनवून बर्थ डे मॅसेज पाठवला होता. तर जान्हवीने याला आय लव्ह यू म्हणत रिप्लॉय दिला होता. सूत्रांच्या माहितीनुसार जान्हवी आणि अक्षतच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. दोघे डियर जिंदगीच्या स्क्रिनिंगला एकत्र दिसले होते. इन्स्टाग्रामवर त्या दोघांचे अनेक एकत्र फोटो आहेत. 

ALSO READ :   ​संजय लीला भन्साळींना भेटण्यासाठी नाही तर ‘या’ कारणासाठी ‘त्या’ बिल्डिंगमध्ये गेली होती जान्हवी कपूर!
 

अक्षत सध्या अमेरिकेतील Tufts University मधून इंटरनॅशनल रिलेशन्सचा कोर्स करतो आहे तर जान्हवी धडकच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.यात तिच्यासोबत शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर झकळणार आहे.  धडक हा मराठी चित्रपट 'सैराट'चा हिंदी रिमेक आहे. झिंग झिंग झिंगाट'च्या तालावर या सिनेमानं रसिकांना अक्षरक्षा याड लावलं.सिनेमाच्या कथेपासून सगळ्याच गोष्टी खास होत्या.त्यामुळे तिकीट खिडकीवरही सैराटने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. यात इशान परश्या तर जान्हवी आर्ची बनून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. दिगवंत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या मुलीच्या लॉँचिंगची जबाबदारी करण जोहरवर सोडली होती. श्रीदेवींनी या चित्रपटासाठी जान्हवीला खास तयार केले होते. जान्हवीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटपासून डान्सिंग क्लासपर्यंत सगळ्यांवर श्रीदेवींची नजर असायची. मुलीचा डेब्यू सिनेमा पाहण्यासाठी श्रीदेवी आतूर होत्या. मात्र ते कदाचित त्यांच्या नशीब नव्हते. येत्या 6 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.   

Web Title: Who is the 'Mysteryboy' in Janhavi Kapoor's life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.