सारा अली खान-अनन्या पांडेनंतर कोणाला डेट करतोय कार्तिक आर्यन?, म्हणाला - "२ वर्षांपासून मी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:09 PM2024-04-11T12:09:06+5:302024-04-11T12:09:37+5:30

Kartik Aaryan : पर्सनल लाईफबद्दल सांगायचे तर कार्तिक आर्यनचे नाव सर्वात आधी सारा अली खानसोबत जोडले गेले होते. नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. मात्र, ब्रेकअपच्या अनेक वर्षानंतरच दोघांनीही ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे मान्य केले.

Who is Karthik Aryan dating after Sara Ali Khan-Ananya Pandey?, said - "For 2 years I..." | सारा अली खान-अनन्या पांडेनंतर कोणाला डेट करतोय कार्तिक आर्यन?, म्हणाला - "२ वर्षांपासून मी..."

सारा अली खान-अनन्या पांडेनंतर कोणाला डेट करतोय कार्तिक आर्यन?, म्हणाला - "२ वर्षांपासून मी..."

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan)ला प्रेमात पडायचे आहे. असे आम्ही म्हणत नाही आहोत तर स्वतः अभिनेता म्हणतो आहे. कार्तिकने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सांगितले की, मागील दोन किंवा अडीच वर्षांपासून तो स्वतःवर आणि त्याच्या सिनेमांकडे लक्ष देत होता. आता त्याला प्रेमात पडायचे आहे. खरेतर कार्तिक आर्यनची स्क्रीनवर लव्हर बॉयची इमेज बनलेली आहे. तरूणी त्याच्यावर फिदा आहेत.

पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यनचे नाव सर्वप्रथम सारा अली खानसोबत जोडले गेले होते. नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. मात्र, ब्रेकअपच्या काही वर्षानंतरही दोघांनीही ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे मान्य केले. यानंतर कार्तिकचे नाव अनन्या पांडेसोबत जोडले गेले. त्यानंतर कार्तिकच्या पश्मिना रोशनसोबतच्या नात्याची बरीच चर्चा झाली. 

'चंदू चॅम्पियन'वर केले होते लक्ष केंद्रित
नो फिल्टर विथ नेहा ६ मध्ये, कार्तिकने लिंकअप आणि डेटिंगच्या अफवांवर सांगितले की तो अजूनही सिंगल आहे पण प्रेमाच्या शोधात आहे. मात्र आता त्याला मिंगल व्हायचे आहे. कार्तिक म्हणाला की, मी बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये येण्याचे टाळत होतो. माझे हे उत्तर तुम्हाला थोडे विचित्र वाटेल, पण मी माझ्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटावर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्यासाठी खूप फोकस आवश्यक होता.

आता माझ्याकडे प्रेमासाठी आहे खूप वेळ
तो पुढे म्हणाला की, "हा चित्रपट माझ्या मनात दोन-अडीच वर्षांपासून चालू आहे, त्यामुळे मला इतर काही विचार करायला वेळ मिळाला नाही. सर्व काही खूप क्षणिक होते. मी रोबोटिक जीवनशैली जगत होतो. बघू कोण मिळते. आता माझ्याकडे प्रेमासाठी खूप वेळ आहे. नेहा, तू माझ्यासाठी कोणीतरी शोध." 

वर्क फ्रंटबद्दल...

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यन सध्या त्याच्या 'भूल भुलैया ३' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात कार्तिक विद्या बालन आणि तृप्ती डिमरीसोबत दिसणार आहे. 'भूल भुलैया'चा हा फ्रँचायझी चित्रपट आहे. याशिवाय कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट यावर्षी रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटासाठी कार्तिकने खूप मेहनत घेतली होती. त्यासाठी त्याने वजनदेखील घटविले. अभिनेत्याने वर्षभर साखर खाल्ली नाही. चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहे. लवकरच निर्माते त्याची रिलीज डेट जाहीर करतील.

Web Title: Who is Karthik Aryan dating after Sara Ali Khan-Ananya Pandey?, said - "For 2 years I..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.