​दीपिकाला वहिनी म्हणून हाक मारणारा कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 15:49 IST2016-06-08T10:19:07+5:302016-06-08T15:49:42+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची लव्हस्टोरी आता चांगलीच बहरु लागलीय. आता रणवीरशी संबधित आणि जवळच्या व्यक्तीसुद्धा दीपिकाला वहिनी-वहिनी ...

Who is Deepika as the bride? | ​दीपिकाला वहिनी म्हणून हाक मारणारा कोण ?

​दीपिकाला वहिनी म्हणून हाक मारणारा कोण ?

पिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांची लव्हस्टोरी आता चांगलीच बहरु लागलीय. आता रणवीरशी संबधित आणि जवळच्या व्यक्तीसुद्धा दीपिकाला वहिनी-वहिनी म्हणून हाक मारु लागलेत.. नुकतंच दीपिका हॉलीवुडचं शुटिंग संपवून अमेरिकेहून मुंबईत परतली.. काही कारणामुळं त्यावेळी दीपिकाचा स्टाफ त्यावेळी तिला घेण्यासाठी विमानतळावर पोहचला नाही. हीच बाब जेव्हा पॅरिसमध्ये बेफिक्रेची शुटिंग करणा-या रणवीरला समजली तेव्हा त्यानं एका चांगल्या बॉयफ्रेंडप्रमाणे आपल्या ड्रायव्हरला दीपिकाला घेण्यासाठी विमानतळावर पाठवलं. त्यानंतर विमानतळावर पोहचलेल्या या ड्रायव्हरनं दीपिकाला वहिनी वहिनी अशी हाक मारली. सगळ्यांसमोर ड्रायव्हरनं अशी हाक मारल्यानं दीपिका लाजली आणि पटकन कारमध्ये बसली. आता कारचा दरवाजा बंद केल्यावर दीपिका त्या ड्रायव्हरला काय म्हणाली हे त्याचं तेच जाणो, मात्र आता रणवीर कॅम्पनं तर दीपिकाला वहिनी बनवून टाकलंय.

Web Title: Who is Deepika as the bride?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.