कुठे आहे 'कच्चा बादाम' फेम गायक भुबन बड्याकर? एका रात्रीत बदललं होतं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:52 IST2025-10-18T12:52:26+5:302025-10-18T12:52:52+5:30
'Kachcha Badam' fame singer Bhuban Badyakar : इंटरनेटच्या जगात कधी काय होईल, काही सांगता येत नाही. इथे रातोरात लोकांचं नशीब बदलतं आणि अनेकांसोबत तसंच घडलं आहे. आत्तापर्यंत असे अनेक लोक आले आहेत ज्यांचे नशीब इंटरनेटने बदलले आहे. याच यादीत 'कच्चा बादाम' गाणं गाऊन प्रसिद्ध झालेल्या भुबन बद्याकरचं नाव येतं.

कुठे आहे 'कच्चा बादाम' फेम गायक भुबन बड्याकर? एका रात्रीत बदललं होतं आयुष्य
इंटरनेटच्या जगात कधी काय होईल, काही सांगता येत नाही. इथे रातोरात लोकांचं नशीब बदलतं आणि अनेकांसोबत तसंच घडलं आहे. आत्तापर्यंत असे अनेक लोक आले आहेत ज्यांचे नशीब इंटरनेटने बदलले आहे. याच यादीत 'कच्चा बादाम' गाणं गाऊन प्रसिद्ध झालेल्या भुबन बद्याकरचं नाव येतं. त्याची कहाणी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आणि रातोरात 'कच्चा बादाम' गाणं गाऊन त्याला प्रसिद्धी मिळाली.
सिंगर भुबनने 'कच्चा बादाम' हे गाणं गायलं, तेव्हा प्रत्येकाने त्याचा व्हिडीओ पसंत केला. बघता बघता ते इंटरनेटवर व्हायरल झाले. त्यानंतर त्यांना बॉलिवूडमधूनही ऑफर येऊ लागल्या. त्याच्या गाण्यावर लोकांनी खूप रील्स बनवल्या आणि सोशल मीडियावर त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. दरम्यान, नुकतेच यूट्यूबर निशू तिवारीने भुबनशी संवाद साधला. त्याने सांगितलं की, त्याच्या या गाण्याने त्याचं नशीब कसं बदललं, पण त्यांच्यासोबत फसवणूकही झाली.
मातीच्या झोपडीत राहणाऱ्या भुबनचं बदललं नशीब
भुबनने सांगितलं की, "मी रस्त्यावर बदाम विकायचो. लोक तुटलेले-फुटलेले मोबाईल आणि इतर वस्तू देऊन बदाम खरेदी करायचे. मग मी विचार केला की, चला यावरच एक गाणं बनवतो. लोकांनी ऐकलं तर ते हसतीलही." याच दरम्यान, कोणीतरी हे गाणं रेकॉर्ड केलं आणि व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. काही दिवसांनी हे गाणं व्हायरल झालं. यानंतर भुबनला अनेकांनी ऑफर दिल्या, तो मुंबईलाही आला आणि त्याने गाणंही गायलं. मातीच्या झोपडीत राहणाऱ्या भुबनचं नशीब बदललं. तो थेट मोठ्या आणि आलिशान घरात राहायला आला. स्वतः भुबन सांगतो की, "आधी मी कच्च्या घरात राहायचो, पण आता माझ्याकडे मोठं घर आहे." त्यांच्या गावच्या लोकांनाही भुबनचा अभिमान वाटतो.
गायकाची झाली फसवणूक
भुबनने पुढे सांगितले की, या गाण्यामुळे त्याला प्रसिद्धी खूप मिळाली, पण त्यांच्यासोबत फसवणूकही खूप झाली. तो म्हणाला की, "मी मुंबईला गेलो होतो आणि तिथून मला ६०-७० हजार रुपये मिळाले. त्यानंतर कोलकात्यामध्ये एक लाख रुपये मिळाले, पण आता या गाण्याचे कॉपीराइट माझ्याकडे नाहीयेत. अनेक लोकांनी मला मोठी मोठी आश्वासने दिली. कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या आणि 'कच्चा बदाम'चे हक्क घेतले." म्हणजे असं म्हणता येईल की, ज्या गाण्यामुळे ते लोकप्रिय झाले, आज तेच गाणं त्याच्याकडे नाहीये.
नशीबाने दिली नाही फारशी साथ
कधीकाळी रस्त्याच्या कडेला बदाम विकणाऱ्या भुबन बद्याकरला स्वतःलाही माहित नसेल की, त्याचा आवाज एक दिवस संपूर्ण जगात घुमेल. २०२१ साली तो आपल्या हातगाडीवर उभे राहून हे गाणं गात होता. त्यानंतर रातोरात जादू झाली. मात्र, त्याच्या नशिबाने जास्त साथ दिली नाही. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, त्याची आर्थिक परिस्थिती ठीक नाही आणि त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.