कधी सुरु होणार ‘नायक2’चे शूटींग?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 12:45 IST2017-01-13T12:45:06+5:302017-01-13T12:45:06+5:30
nayak-2 to get on floors this year: nayak-2 : अनिल कपूर व राणी मुखर्जी स्टारर ‘नायक’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. २००१मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचा सीक्वल लवकरच तुमच्या-आमच्या भेटीला येणार आहे. पहिला चित्रपट संपला तिथून या सीक्वलची कथा सुरु होणार आहे.

कधी सुरु होणार ‘नायक2’चे शूटींग?
अ िल कपूर व राणी मुखर्जी स्टारर ‘नायक’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. २००१मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाचा सीक्वल लवकरच तुमच्या-आमच्या भेटीला येणार आहे. पहिला चित्रपट संपला तिथून या सीक्वलची कथा सुरु होणार आहे. तूर्तास या चित्रपटाची कास्ट ठरलेली नाही. पण चित्रपटाची पटकथा मात्र तयार आहे. के. व्ही. विजेन्द्र प्रसाद यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाची पटकथाही विजेन्द्र प्रसाद यांनीच लिहिली होती.
याच वर्षात या सीक्वलचे शूटींग सुरु होणार आहे. त्यामुळे २०१८ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणे अपेक्षित आहे.
‘नायक’ या चित्रपटाचे बॉक्सआॅफिसवर फार बिझनेस केला नव्हता. पण टीव्हीवर टेलिकास्ट झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला मनापासून दाद दिली होती. बहुतांश प्रेक्षकांनी मोठ्या पडद्याऐवजी छोट्या पडद्यावरच हा चित्रपट पाहिला होता. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक शंकर यांनी ‘नायक’चे दिग्दर्शन केले होते. अनिल कपूर, राणी मुखर्जी यांच्यासह अमरिश पुरी, परेश रावल आणि जॉनी लिव्हर हे यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. ‘नायक’ बॉक्सआॅफिसवर गाजला नव्हता. आता ‘नायक’चा सीक्वल बॉक्सआॅफिसवर किती यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवाय या चित्रपटात कुणाची वर्णी लागते, हे पाहणेही तितकेच इंटरेस्टिंग असणार आहे.
‘नायक2’ हा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. अनिल कपूरने ‘नायक’मध्ये शिवाजीराव गायकवाड या रिपोर्टरची भूमिका साकारली होती. शिवाजीरावला एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवले जाते. या एका दिवसात शिवाजीराव जनतेच्या हिताच्या निर्णयांचा धडका लावतो आणि भ्रष्टांना धडा शिकवतो. अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवासही असाच काहीसा फिल्मी आहे. त्यामुळे ‘नायक2’मध्ये त्यांची कथा असेल, असे मानले जात आहे. अर्थात ही केवळ चर्चा आहे. खरे काय, ते लवकरच कळेल.