अख्खे कुटुंब पडद्यावर कधी दिसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:29 IST2016-01-16T01:15:33+5:302016-02-13T04:29:11+5:30

नुकताच प्रदर्शित झालेला शानदार चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरी शाहिद कपूरसाठी हा चित्रपट नेहमी स्पेशल राहील. कारण तो ...

When will the entire family screen be seen? | अख्खे कुटुंब पडद्यावर कधी दिसणार?

अख्खे कुटुंब पडद्यावर कधी दिसणार?

कताच प्रदर्शित झालेला शानदार चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरी शाहिद कपूरसाठी हा चित्रपट नेहमी स्पेशल राहील. कारण तो पहिल्यांदाच या चित्रपटात आपल्या वडिलांसोबत दिसला आणि याच चित्रपटात त्याच्या बहिणीनेसुद्धा काम केले आहे. असेही म्हणता येऊ शकते की हा चित्रपट त्यांच्यासाठी कौटुंबिक चित्रपट झाला आहे. येणार्‍या काही दिवसात शाहिदला सुप्रिया पाठक (पंकज कपूर यांची पत्नी)सोबत देखील पाहता येईल. शाहिदची आई नीलिमा अजीम यांनी देखील अनेक चित्रपटात काम केले आहे, मात्र अनेक दिवसांपासून त्या चित्रपटापासून दूर आहेत. सुप्रिया पाठक यांची बहीण रत्ना शाह देखील मोठय़ा अभिनेत्री मानल्या जातात. त्यांचेही संपूर्ण कुटुंब अभिनयाशी जोडलेले आहे. आमिर खानच्या कंपनीद्वारे निर्मित न तू जाने न हममध्ये रत्ना यांनी पती नसीरुद्दीन शाहसोबत काम केले होते. नसीर यांचे दोन्ही मुले चित्रपटात आली आहेत. शाहरुख खानच्या हैप्पी न्यू ईयरमध्ये विवान शाहने काम केले, तर ईमाद शाहने प्रकाश झा यांच्या कंपनीच्या दिल दोस्ती ईटीसीमध्ये काम केले आहे. आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे की कोणत्या चित्रपटात नसीर आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसू शकतील. याचे उत्तर येणार्‍या काळातच मिळू शकेल.
बॉलिवूडमध्ये आणखी असे कुटुंब आहे, जेथे सर्व जण अभिनयाशी जोडलेले आहेत. आम्ही बच्चन कुटुंबाबद्दल बोलत आहोत. आर. बाल्की आपल्या एखाद्या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, ऐश्‍वर्या आणि अभिषेकला सोबत आणण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी ते एका कथेवर काम करीत असल्याचीही चर्चा आहे. भट्ट परिवाराचा विचार केला तर महेश भट्ट यांची मुलगी पूजा चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. तर लहान मुलगी आलियाची इच्छा आहे की, तिने दिल है कि मानता नहीं है च्या रिमेकमध्ये काम करावे. भट्ट यांचा मुलगा राहुलदेखील चित्रपटात येण्याची तयारी करीत आहे. महेश भट्ट यांचे भाऊ मुकेश भट्ट यांची मुलगी विशेष डायरेक्शनमध्ये आली आहे. विद्या बालनच्या सासूरवाडीत दोन दिग्गज अभिनेते आहेत. 

Web Title: When will the entire family screen be seen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.