जेव्हा गर्दीतून आवाज येतो...दिपीका..दिपीका..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 22:45 IST2016-03-16T05:44:01+5:302016-03-15T22:45:33+5:30

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे बॉलीवूडमधील सर्वांत हॉट कपलपैकी एक आहे. ‘बाजीराव-मस्तानी’ मध्ये दोघांनी एकत्र काम केले आणि ...

When the voice comes from the crowd ... Deepika .. Dipika .. | जेव्हा गर्दीतून आवाज येतो...दिपीका..दिपीका..

जेव्हा गर्दीतून आवाज येतो...दिपीका..दिपीका..

वीर सिंग आणि दीपिका पदुकोन हे बॉलीवूडमधील सर्वांत हॉट कपलपैकी एक आहे. ‘बाजीराव-मस्तानी’ मध्ये दोघांनी एकत्र काम केले आणि त्यांच्या प्रेमाला चाहत्यांचीही परवानगी मिळाली.

दीपिका सध्या तिचा आगामी हॉलीवूड चित्रपटासाठी शूटिंग करत असून रणवीरही ‘बेफिके्र’ साठी शूटींग करत आहे. पण नुकतेच काय झाले? रणवीर मुंबईत फरहान अख्तरचा लाईव्ह कॉन्सर्ट ऐकण्यासाठी गेला. तेव्हा सर्व प्रेक्षकांनी त्याला पाहताच गोंधळ करायला सुरूवात केली.

चाहत्यांना त्यांचे दोन सेलिब्रिटी एकाच ठिकाणी एकाच स्टेजवर मिळाले मग काय? सर्वांचा आवाज स्तर ऐकून रणवीर ज्यावेळी स्टेजवर आला तेव्हा गर्दीतून त्याची गर्लफ्रेंड दीपिका पदुकोनचे नाव घेऊन सर्वजण ओरडू लागले. त्याने सर्वांना शांत केले पण त्याच्या खास शैलीत! रणवीर म्हटल्यावर हा गोंधळ आणि हंगामा तर होणारच होता हो ना!

http://www.missmalini.com/2016/03/15/video-ranveer-singh-went-stage-crowd-started-chanting-deepika-padukones-name/

Web Title: When the voice comes from the crowd ... Deepika .. Dipika ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.