​वरूण धवनला क्रिकेटचा ‘देव’ भेटतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 15:26 IST2017-02-22T09:56:05+5:302017-02-22T15:26:05+5:30

क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याला भेटण्यासाठी बडे बडे दिग्गज आतूर असतात. सध्या आपल्या ‘दुल्हनियां’सोबत बिझी असलेला वरूण धवन ...

When Varun Dhawan meets cricket's 'God' ... | ​वरूण धवनला क्रिकेटचा ‘देव’ भेटतो तेव्हा...

​वरूण धवनला क्रिकेटचा ‘देव’ भेटतो तेव्हा...

रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याला भेटण्यासाठी बडे बडे दिग्गज आतूर असतात. सध्या आपल्या ‘दुल्हनियां’सोबत बिझी असलेला वरूण धवन यालाही अलीकडे क्रिकेटच्या या देवाला भेटण्याची संधी मिळाली. साक्षात सचिनला भेटण्याची संधी म्हटल्यावर वरूण एकदम हरकून गेला. प्रत्यक्ष भेटल्यावर तर त्याची अवस्था वेगळीच झाली. होय, एखाद्या मंदिरात उभे राहून परमेश्वरासमोर प्रार्थना करतोय, असे वरूणला त्याक्षणी वाटले.



मुंबईच्या एका स्टुडिओत आलिया भट्ट आणि वरूण धवन हे दोघे ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’च्या प्रमोशनल शूटींगमध्ये बिझी होते.  याच स्टुडिओत दुसरीकडे सचिन शूटींग करत असल्याचे वरूणला कळले. मग काय, वरूणचे कामात काही केल्या लक्ष लागेना. कधी एकदा सचिनला भेटतो, असे वरूणला झाले. मग काय, तो थेट पोहोचला सचिनला भेटायला. या भेटीनंतर वरूण प्रचंड भावूक झालेला दिसला. सचिनला लोक क्रिकेटचा देव मानतात. त्याचे मोठेपण मला सांगण्याची गरज नाही. त्यामुळे त्याला भेटून मला कसे वाटले असेल, हे तुम्ही समजू शकता. मंदिरात उभा राहून देवाची प्रार्थना करतोय, असेच मला एक क्षण वाटले.
वरूण धवन सध्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानंतर तो ‘जुडवा2’ या चित्रपटात दिसणार आहे. आलियाचे प्रेम मिळवण्यासाठी ब्रदीची धडपड ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटात वरूणने बद्रीनाथ अर्थात बद्रीची भूमिका साकारली आहे. बद्रीचे प्रेमात पडण्याचे वय कधीच निघून गेलेले असते. त्यामुळे त्याला आता थेट लग्नच करायचे असते. पण आलिया मात्र त्याला लग्नासाठी ठाम नकार देते. यानंतर आलियाचे मन वळवण्यासाठी बद्रीना नाही-नाही ते करावे लागते.

यापूर्वी ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये वरूण व आलियाची जोडी दिसली होती. आधी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’चा सीक्वल असल्याचे म्हटले जात होते. पण हा त्याचा सीक्वल नसून दुसरी इंस्टॉलमेंट आहे.  
 

Web Title: When Varun Dhawan meets cricket's 'God' ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.