बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचे नखरे आले अंगाशी, नाराज झालेल्या सोनाक्षी सिन्हाची मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 17:12 IST2021-05-11T17:11:51+5:302021-05-11T17:12:29+5:30

सोनाक्षीची ही मुलाखत बरीच व्हायरल झाली होती.

When sonakshi sinha accused sonam kapoor of showing attitude know what happened next | बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचे नखरे आले अंगाशी, नाराज झालेल्या सोनाक्षी सिन्हाची मागितली माफी

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचे नखरे आले अंगाशी, नाराज झालेल्या सोनाक्षी सिन्हाची मागितली माफी

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि सोनम कपूर (Sonam Kapoor)  यांच्यात काही काळापूर्वी गैरसमज निर्माण झाल्याची चर्चा होती.  एका चॅट शोमध्ये आलेली सोनाक्षी सिन्हाने सांगितले की, , 'एका कार्यक्रमादरम्यान सोनम कपूरने तिला अ‍ॅटिड्यूड दाखवला होता,, जो दाखविण्याची अजिबात गरज नव्हती.' सोनाक्षीची ही मुलाखत बरीच व्हायरल झाली आणि यावर सोनम कपूरने सोशल मीडियावरही आपली प्रतिक्रिया दिली होती.

सोनाक्षी सिन्हा यांच्या कथित वक्तव्यावर सोनम कपूर म्हणाली, 'सोनाक्षी, मी नेहमीच तुझा आदर करते, मझ्या लक्षात नाही आपल्यामध्ये असं काही कधी घडलं होते, जर तुला वाईट वाटलं असेल तर मी तुझी माफी मागते.'  सोनम कपूरच्या या प्रतिक्रियेवर सोनाक्षी सिन्हाने तिला रिप्लाय देताना लिहिले की, 'सोनम  वेड्या सारखी वागू नकोस, तुला माहिती आहे हे टीव्ही शो वाले  बर्‍याचदा जाणीवपूर्वक अशा गोष्टी बोलायला लावतात ज्या आम्हाला म्हणायच्या नसतात. यातले काहीच सीरिअसली घेऊ नकोस. तुला खूप सारे प्रेम. '

२०१९मध्ये सोनाक्षीने चार सिनेमे केलेत. यातील ‘दबंग3’ वर्षाच्या शेवटला रिलीज झाला. 2019 मध्ये सोनाक्षीने कलंक, खानदानी शफाखाना आणि मिशन मंगल, दबंग ३ असे चार सिनेमा रिलीज झाले.सोनाक्षीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर ती अजय देवगणच्या 'भूज द प्राइड ऑफ इंडिया' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमादेखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: When sonakshi sinha accused sonam kapoor of showing attitude know what happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.