नकली दात लावून एक्स-गर्लफ्रेन्डला भेटायला गेला होता सलमान खान; वाचा, पुढे काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 11:41 AM2021-09-12T11:41:14+5:302021-09-12T11:42:13+5:30

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या गर्लफ्रेन्ड्सची यादी बरीच मोठी आहे. त्यामुळेच त्याच्या एक ना अनेक लव्हस्टोरीची चर्चा आजही होते.

when salman khan try to meet with his ex-girlfriend with help of artificial teeth | नकली दात लावून एक्स-गर्लफ्रेन्डला भेटायला गेला होता सलमान खान; वाचा, पुढे काय झालं?

नकली दात लावून एक्स-गर्लफ्रेन्डला भेटायला गेला होता सलमान खान; वाचा, पुढे काय झालं?

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान अनेकींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. सर्वप्रथम संगीता बिजलानी, मग सोमी अली,ऐश्वर्या राय अशा अनेकींची नाव घेता येईल.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या गर्लफ्रेन्ड्सची यादी बरीच मोठी आहे. त्यामुळेच त्याच्या एक ना अनेक लव्हस्टोरीची चर्चा आजही होते. अगदी वयाच्या 18 व्या वर्षी सलमान एकाच वेळी दोन अभिनेत्रींना डेट करण्याचा प्रयत्न केला होता. आता एकाच वेळी दोघींना सांभाळायचं म्हटल्यावर फजिती होणारच. असाच एक मजेशीर किस्स्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खुद्द सलमानने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हा किस्सा सांगितला होता. 

तर तेव्हा सलमान जेमतेम 18 वर्षांचा होता. एकाचवेळी दोन मुलींना प्रेमजाळ्यात फासण्याचा त्याचा प्रयत्न होता. याबद्दल सांगताना तो म्हणाला होता, ‘खूप वर्षाआधी कुणाला तरी डेट करत होतो. पण याचदरम्यान दुसरी आवडू लागली होती.  मी फार सीरिअस नव्हतो. 17-18 वर्षांचं वय होतं. एक्स-गर्लफ्रेन्ड पुन्हा आयुष्यात आली होती. ती अडचणीत असल्यानंतर तिला भेटायला जावंच लागणर होतो.   तिलाच भेटायला जायचं होतं. पण नव्या गर्लफ्रेन्ड कळलं तर तिला वाईट वाटेल, म्हणून काहीतरी करायला हवं असं मला वाटलं.

माझे अंकल डेंटिंस्ट होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि नकली दात बनवला. नकली दात लावून गेलो तर आपल्याला कुणीच ओळखू शकणार नाही, असा माझा समज होता. मी हॉटेलात गेलो. एक्स गर्लफ्रेंड आधीच तिथे पोहोचली होती. विशेष म्हणजे,नवी गर्लफ्रेन्डही तिथं होती. मला पाहताच तिनं मला ओळखलं. तुझ्या दातांना काय झालं, असं ती मला म्हणाली. ते ऐकून काय करावं सुचेना. माझी युक्ती फसली होती. मी पकडला गेलो होतो. अखेर मी माझा गर्लफ्रेन्डला सर्व खरं खरं सांगितलं...,’
सलमान अनेकींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. सर्वप्रथम संगीता बिजलानी, मग सोमी अली,ऐश्वर्या राय अशा अनेकींची नाव घेता येईल. यानंतरही त्याचं नाव अनेकींशी जोडलं गेलं. याची चर्चा अधूनमधून होत असते.

Web Title: when salman khan try to meet with his ex-girlfriend with help of artificial teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.