जेव्हा ऐश भेटते दलबीर कौरला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 21:24 IST2016-02-18T04:24:05+5:302016-02-17T21:24:05+5:30

ऐश्वर्या रॉय बच्चन सध्या ओमंग कुमार यांचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून ती यात दलबीर कौरची भूमिका ...

When Ashbe meets Dalbir Kaur ... | जेव्हा ऐश भेटते दलबीर कौरला...

जेव्हा ऐश भेटते दलबीर कौरला...

्वर्या रॉय बच्चन सध्या ओमंग कुमार यांचा आगामी चित्रपट ‘सरबजीत’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असून ती यात दलबीर कौरची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील तिच्या भूमिकेला बळकटी येण्यासाठी ती नुकतीच दलबीर कौर हिला भेटली आहे.

सरबजीतला न्याय मिळवून देण्यासाठी त्याची बहीण दलबीर शेवटपर्यंत झगडा देते. यावर आधारित तिचे कॅरेक्टर असल्याने ऐश दलबीरला भेटली. सेटवर तिने दलबीर कौरसोबत बराच वेळ घालवला. दलबीर जेव्हा ऐशला भेटली तेव्हा चक्क तिने ऐशचे आभार मानले. ऐश जी भूमिका करत आहे ते आयुष्य दलबीरने जगले आहे.  

रणदीप हुडा हा सरबजीतच्या भूमिकेत आहे. सरबजीत सिंग चुकून पाकिस्तानाच्या हद्दीत जातो. आणि पाकिस्तान सुप्रीम कोर्ट त्याला गुप्तहेर समजून मृत्यूदंड ठोठावतात. त्याची करूण कहानी म्हणजे सरबजीत चित्रपट आहे. दलबीर कौर त्याच्या सुटकेसाठी भारत आणि पाकिस्तान दोन्हींच्या राष्ट्रपतींना भेटते पण त्याचा काही फायदा होत नाही.

Web Title: When Ashbe meets Dalbir Kaur ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.