जेव्हा पती अमिताभ बच्चन गर्लफ्रेंड रेखासोबत बोलत होते, तेव्हा संतापलेल्या जया बच्चनने भडकावली श्रीमुखात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 16:23 IST2017-08-22T10:09:36+5:302017-08-22T16:23:43+5:30

अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीविषयी जेव्हा जेव्हा चर्चा रंगल्या तेव्हा तेव्हा चाहत्यांनी अतिशय चविष्टपणे त्यावर आपली मते व्यक्त ...

When Amitabh Bachchan was talking to the girlfriends, when the angry Jaya Bachchan shouted, "Shukla! | जेव्हा पती अमिताभ बच्चन गर्लफ्रेंड रेखासोबत बोलत होते, तेव्हा संतापलेल्या जया बच्चनने भडकावली श्रीमुखात!

जेव्हा पती अमिताभ बच्चन गर्लफ्रेंड रेखासोबत बोलत होते, तेव्हा संतापलेल्या जया बच्चनने भडकावली श्रीमुखात!

िताभ बच्चन आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीविषयी जेव्हा जेव्हा चर्चा रंगल्या तेव्हा तेव्हा चाहत्यांनी अतिशय चविष्टपणे त्यावर आपली मते व्यक्त केली. आज आम्ही याच लव्हस्टोरीमधील एक प्रसंग तुम्हाला सांगणार आहोत. हा प्रसंग तेव्हाचा आहे, जेव्हा या दोघांमधील अफेयरची चर्चा सर्वत्र पसरली होती. रेखाने स्वत:हून अमिताभसोबतच्या नात्यावर स्वत:हून शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे इंडस्ट्रीमधील प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शक या दोघांना घेऊन चित्रपट बनविण्यास उत्सुक होते. परंतु पत्नी जया बच्चन या दोघांना कुठल्याही स्थितीत एकत्र येऊ देत नव्हत्या. अशात जे घडायचे तेच झाले, मग संतापलेल्या जया यांनी चक्क श्रीमुखात भडकावली होती. 

रेखा आणि अमिताभ एकमेकांवर किती प्रेम करायचे हे सगळ्यांनाच माहिती होते. यामुळेच जया या दोघांना जवळ येऊ देत नव्हत्या. अशात ‘राम-बलराम’चे निर्माते टीटो टोनी हे अमिताभ आणि रेखा यांच्यासोबत एक चित्रपट बनवू इच्छित होते. जेव्हा ही बाब जयाला कळाली तेव्हा तिने टीटो टोनी यांना रेखाऐवजी दुसºया अभिनेत्रींचा विचार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर टीनो यांनी रेखाऐवजी झीनत अमान हिच्या नावाचा विचार केला. मात्र जेव्हा ही बाब रेखाला कळली तेव्हा तिने टीनो यांच्याकडे तिची बाजू मांडली. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी मी एक रुपयाही मानधन घेणार नसल्याचे तिने टीनो यांना सांगितले. त्यानंतर टीनो यांच्याही मतात परिवर्तन झाले, त्यांनी पुन्हा रेखाचे नाव रेटून नेले. 



काही दिवसांनंतर लगेचच त्यांनी चित्रपटातील कास्टिंगची घोषणा केली. त्यात अमिताभ आणि रेखा हे दोघे मुख्य भूमिकेत असतील, असेही स्पष्ट केले. ही बातमी जया बच्चन यांना खूपच मोठा धक्का देणारी ठरली. त्यांचा प्रचंड संताप झाला होता. मात्र त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवले, पण त्याचबरोबर त्यांनी ही जोडी एकत्र येऊ नये याकरिता वेगळी क्लृप्ती आखली. त्या कोणालाही न सांगता अचानकच सेटवर पोहचत असत. पती अमिताभला रेखापासून कसे दूर ठेवता येईल, यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू असायची. 

एक दिवस अशाच अचानकपणे जया सेटवर पोहचल्या होत्या. सेटवर आल्यावर त्यांनी बघितले की, रेखा अमिताभसोबत बोलत होती. ही बाब जयाचा राग अनावर करणारी ठरली. दोघांना या स्थितीत बघून त्या प्रचंड संतप्त झाल्या. त्यांनी अमिताभशी काहीही न बोलता रेखाच्या श्रीमुखात जोरदार भडकावली. ही बातमी इंडस्ट्रीमध्ये वाºयासारखी पसरली. शिवाय तेव्हापासून रेखा आणि जया यांच्यात दुश्मनी निर्माण झाली. आजही या दोघींमधील वैर कायम आहे. जेव्हा जेव्हा या दोघींचा सामना होतो, तेव्हा तेव्हा त्या एकमेकींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. 

Web Title: When Amitabh Bachchan was talking to the girlfriends, when the angry Jaya Bachchan shouted, "Shukla!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.