जेव्हा ‘या’ अभिनेत्रीने बेडरूम सीन करण्याची मागितली परवानगी; तेव्हा तिच्या वडिलांची अशी होती रिअ‍ॅक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 18:43 IST2018-01-28T13:12:39+5:302018-01-28T18:43:39+5:30

‘२४’ या टीव्ही शोमध्ये बघावयास मिळालेली अभिनेत्री सपना पब्बी हिने तिच्या करिअरची सुरुवात ‘खामोशियां’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात ...

When the 'act' allowed to order a bedroom sequence; Her father had such a reaction! | जेव्हा ‘या’ अभिनेत्रीने बेडरूम सीन करण्याची मागितली परवानगी; तेव्हा तिच्या वडिलांची अशी होती रिअ‍ॅक्शन!

जेव्हा ‘या’ अभिनेत्रीने बेडरूम सीन करण्याची मागितली परवानगी; तेव्हा तिच्या वडिलांची अशी होती रिअ‍ॅक्शन!

४’ या टीव्ही शोमध्ये बघावयास मिळालेली अभिनेत्री सपना पब्बी हिने तिच्या करिअरची सुरुवात ‘खामोशियां’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात तिने अनेक बोल्ड सीन दिले. नुकतेच प्रदशित झालेल्या ‘ब्रीद’ या वेबसीरिजमध्ये ती अभिनेता आर. माधवन यांच्यासोबत बघावयास मिळत आहे. यानिमित्त तिने एका वेबसाइटला मुलाखत दिली असता, तिने तिच्या करिअरमधील अनेक टप्पे बिंधास्तपणे उलघडले. जेव्हा तिला ‘खामोशियां’ या चित्रपटाबद्दल विचारले तेव्हा तिने म्हटले की, ‘हा चित्रपट मी माझ्या डॅडला विचारून साइन केला होता. 

सपनाने म्हटले की, ‘मी त्यांना फोन करून सांगितले की, मला एका चित्रपटाचा प्रस्ताव आला आहे. ज्यामध्ये बरेचसे बेडरूम सीक्वेंस आहेत. माझे हे शब्द ऐकून ते शांत झाले. तेव्हा मी त्यांना म्हटले की, पापा अशाप्रकारचे सीन करिना कपूरने ‘कुर्बान’मध्ये केले आहेत. प्रियंका चोपडानेही ‘एतराज’मध्ये असे सीन केले. त्यांनतर त्यांनी फोनवर मला चित्रपटात काम करण्यास नकार दिला नाही, मात्र त्याचबरोबर या मुद्द्यावर पुन्हा कधी चर्चाही केली नाही. 

पुढे बोलताना सपनाने म्हटले की, जेव्हा मी लहान होती तेव्हा मला एअर होस्टेस बनायचे होते. मात्र डॅडनी मला या क्षेत्रात करिअर करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिल्याने मी हा विचार मनातून काढून टाकला. त्यानंतर मी जेव्हा डॅडला मला अभिनय करायचा असे सांगितले तेव्हा त्यांना मला चांगलेच खडसावले. त्यामुळे मी अभिनयाचा ‘अ’ विसरून गेली. माझे वडील खूपच सक्त आहेत, अगदी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधील अमरीश पुरीप्रमाणे.  



त्यानंतर जेव्हा मी जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश केला तेव्हा मॉडलिंग करायला सुरुवात केली. त्यावेळी माझे वडील माझ्याजवळ नसल्याने मला मॉडलिंग करता आली. मी पॉकेटमनीसाठी मॅकडॉनल्ड्समध्येही काम केले. पुढे ग्रॅज्युएट केल्यानंतर मी एका मल्टी नॅशनल कंपनीत काम करायला सुरुवात केली. मी माझा जॉब आणि आयुष्यात आनंदी होती. त्याचबरोबर मला एका टीव्ही शोची आॅफर आली. याबाबत मी माझ्या आईशी चर्चा केली तेव्हा तिने म्हटले, ‘तू वेडी झाली आहेस काय? अगोदर तुझ्या वडिलांना तर विचार? हे शब्द ऐकताच मी फ्लॅशबॅकमध्ये गेली. कारण दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी त्यांना हे विचारले होते, तेव्हा ते चांगलेच भडकले होते. 

अशाही स्थितीत मी घाबरत-घाबरत त्यांना विचारण्याचे धाडस केले. मी त्यांना विचारले अन् त्यांनी परवानगी दिली. त्यांनी म्हटले की, ‘तू मोठी आणि समजूतदार झाली आहेस. त्यामुळे आता तू करिअरसाठी अभिनय हे क्षेत्र निवडू शकतेस. अशापद्धतीने माझी इंडस्ट्रीत सुरुवात झाल्याचे सपनाने सांगितले. 

Web Title: When the 'act' allowed to order a bedroom sequence; Her father had such a reaction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.