अखेर किती पैसे कमावितात प्रियंका चोप्रा आणि निक जोनस? प्रॉपर्टीचा आकडा वाचून तुम्हाला येईल भोवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 16:33 IST2020-03-20T16:32:44+5:302020-03-20T16:33:30+5:30
जाणून घ्या, प्रियंका चोप्रा व निक जोनस यांच्या संपत्तीचा आकडा

अखेर किती पैसे कमावितात प्रियंका चोप्रा आणि निक जोनस? प्रॉपर्टीचा आकडा वाचून तुम्हाला येईल भोवळ
प्रियंका चोप्रा व निक जोनास यांच्यासारखे आनंदी जोडपे शोधूनही सापडणार नाही. होय, सध्या प्रियंका व निक दोघेही संसारात आनंदी आहेत. 2018 मध्ये प्रियंका व निक लग्नबेडीत अडकले. हिंदू व ख्रिश्चन पद्धतीने दोघांनीही लग्नगाठ बांधली. गेल्या दोन वर्षांपासून ते दोघं एकत्र आहेत आणि सिनेइंडस्ट्रीत धूम माजवित आहेत. ते दोघे खूप लोकप्रिय असून त्या दोघांकडे मिळून 734 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वात आधी बोलायचं तर बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्राचा फोर्ब्सच्या यादीत समावेश आहे. तिची वर्षाची जवळपास कमाई 23.7 कोटी रुपये इतकी आहे. ती एका स्टेज परफॉर्मन्ससाठी जवळपास पाच कोटी रुपये इतके मानधन घेते आणि चित्रपटात काम करण्यासाठी ती 8 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय ती ब्रॅण्ड्सची जाहिरात करते ज्यामुळे प्रियंकाला चांगलेच मानधन मिळते.
प्रियंका चोप्राशिवाय तिचा नवरा निक जोनसबद्दल सांगायचं तर त्याच्याकडे 25 मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे जी प्रियंका चोप्राच्या तुलनेत कमी नाही. प्रियंका व निकने नुकताच एक मोठा बंगला विकत घेतला आहे. ज्याची किंमत 144 कोटी रुपये इतकी आहे. ही फार कमी किंमत नाही. प्रियंकाकडे भारतातही कोटींची प्रॉपर्टी आहे.
नुकतीच होळीला प्रियंका नवरा निक जोनससोबत भारतात आली होती. यावेळी तिने होळी सेलिब्रेशन केले. यादरम्यानचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती द स्काय इज पिंक चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटात तिच्यासोबत झायरा वसीम व फरहान अख्तर मुख्य भूमिकेत होते.हा चित्रपट समीक्षकांना खूप भावला. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही.