​‘बाहुबली2’नंतर राजमौलींचा काय असेल नवा प्रोजेक्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 16:05 IST2017-01-12T16:05:36+5:302017-01-12T16:05:36+5:30

‘बाहुबली’फेम दिग्दर्शक एसएस राजमौली यांचा ‘बाहुबली2’ येत्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होत आहे. कालपरवा या चित्रपटाचे शूटींग शेड्यूल संपले. राजमौली यांनी ...

What will be the new project after 'Bahubali2'? | ​‘बाहुबली2’नंतर राजमौलींचा काय असेल नवा प्रोजेक्ट?

​‘बाहुबली2’नंतर राजमौलींचा काय असेल नवा प्रोजेक्ट?

ाहुबली’फेम दिग्दर्शक एसएस राजमौली यांचा ‘बाहुबली2’ येत्या एप्रिलमध्ये प्रदर्शित होत आहे. कालपरवा या चित्रपटाचे शूटींग शेड्यूल संपले. राजमौली यांनी सोशल मीडियावर या ‘रॅप-अप’चे काही फोटो शेअर केले होते.  ‘बाहुबली2’ नंतर राजमौली प्रेक्षकांसाठी काय घेऊन येणार आहेत?, हे जाणून घ्यायला तुमच्या आमच्यापैकी कुणाला आवडणार नाही. नेमक्या याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

‘बाहुबली2’नंतर राजमौली पुन्हा एकदा ‘बाहुबली’सारखाच बिग-बजेट प्रोजेक्ट घेऊन येणार आहेत. होय,‘बाहुबली2’नंतर राजमौली महाभारतावर चित्रपट घेऊन येऊ शकतात. मीडियातील बातम्या खºया मानाल तर, राजमौली तीन वेगवेगळ्या भागांत हा एपिक ड्रामा बनवणार आहेत. लवकरच याची तयारी सुरु होणार आहे. केवळ एवढेच नाही त्यांच्या या प्रोजेक्टमध्ये बॉलिवूडचे अनेक दिग्गज भूमिका साकारताना दिसू शकतात. सूत्रांची मानाल तर, सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर खान असे बॉलिवूडचे तिन्ही ‘खान’ शिवाय मेगास्टार अमिताभ बच्चन व अक्षय कुमार यात दिसू शकतात.

तुम्हाला वाचून आनंद होईल की, स्वत:  आमिर खानने  राजमौलींच्या या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अलीकडे एका मुलाखतीत आमिरने ही इच्छा बोलून दाखवली होती. मी राजमौली यांचा मोठा चाहता आहे. ते ‘महाभारत’ बनवणार असतील तर त्यात कृष्ण किंवा कर्णाची भूमिका करायला मला आवडेल. तसे मला कृष्ण बनायला सर्वाधिक आवडेल, असे आमिर म्हणाला होता.
 प्रभासची मुख्य भूमिका असलेला ‘बाहुबली2’चे शूटींग ६१३ दिवस चालले. प्रभासने हैदराबादेत या चित्रपटाचा शेवटचा सीन शूट केला. यानंतर राजमौली यांनी चित्रपटाच्या रॅप-अपची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. 

Web Title: What will be the new project after 'Bahubali2'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.